Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव शहर, उपनगरात गणरायाचे भक्तिमय वातावरणात स्वागत

Spread the love

 

बेळगाव : मागील काही दिवसांपासून आपल्या लाडक्या गणरायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गणेशभक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि आज पहाटेपासूनच बेळगाव शहर तसेच उपनगरात घरोघरी गणरायाचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले आणि श्रीगणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. आपल्या लाडक्या बाप्पाला मोदकाचा तसेच गोडधोडाचा नैवेद्य दाखवून तरुणाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.
“गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणरायाचे जल्लोषी स्वागत करण्यात मग्न होती. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी फटाक्यांच्या आतिषबाजीसह पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणरायाचे स्वागत करण्यात आले. मागील काही दिवसापासून सर्वत्र गणरायाच्या आगमनाची पूर्वतयारी करण्यात येत होती. सजावटीच्या साहित्यानी बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. अनेक ठिकाणी तरुणवर्ग दिवसभर कॉलेज किंवा आपला व्यवसाय सांभाळून रात्री गणरायाची आरास करण्यात मग्न असलेले पहावयास मिळत होते. आज सकाळपासूनच सर्वत्र गणरायाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *