Friday , October 18 2024
Breaking News

‘अरिहंत’ स्पिनिंग मिल अध्यक्षपदी उत्तम पाटील

Spread the love
उपाध्यक्षपदी अशोक पडनाड : निवडणूक बिनविरोध 
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यात स्पिनिंग मिल सेक्टरमध्ये सर्वांना मार्गदर्शक ठरत असलेल्या बोरगाव येथील श्री अरिहंत को. ऑप. स्पिनिंग मिलची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये अध्यक्षपदी युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील तर उपाध्यक्ष म्हणून अशोक पराप्पा पडनाड यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी उदय पाटील यांनी सांगितले.
मिलच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी संचालक पदी युवा उद्योजक अभिनंदन पाटील, भरमु मगदूम, बिपीन सोलकन पाटील, पद्मावती शेट्टी, जयकुमार पाटील, रोहित चौगुला, सिद्धाप्पा नागनुर, प्रमोद होसुरे, महावीर कात्राळे, करोले, सागर मधाळे, राजेंद्र ऐदमाळे व बाबासाहेब बेडकिहाळे, यांची संचालक म्हणून निवड झाली.
सन 2021-22 ते 2026-27 या साला करिता ही निवडणूक झाली. निवडणूक प्रक्रियेनंतर सर्वच नवनिर्वाचित संचालकांसह अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन अध्यक्ष उत्तम पाटील यांनी, आमचे नेते मार्गदर्शक, सहकारमहर्षी रावसाहेब पाटील( दादा) यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली. यासाठी सर्व सभासदांचे सहकार्य मिळाले आहे. आजपर्यंत सभासद व संचालकांनी दिलेल्या सहकार्यास मी ऋणी आहे. सर्व संचालकामुळे दुसऱ्यांदा अध्यक्षपदी  निवड झाली.यापुढे आपण मिलच्या अडीअडचणी, कामगार प्रश्न, यासह अनेक समस्या मार्गी लावून सीमाभागातील हा कारखाना कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यात आदर्श व्हावा, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. संचालक मंडळाचे सहकार्यामुळे मिलची प्रगती होत आहे. या ठिकाणी काम करीत असलेल्या निस्वार्थी व प्रामाणिक कर्मचाऱ्यांचीही मिलच्या जडणघडणीत मोलाचे सहकार्य मिळत आहे संचालक मंडळांने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.
याप्रसंगी यांची उपाध्यक्ष सुभाष शेट्टी, संचालक अभयकुमार करोले, टेक्निकल डायरेक्टर दिलीप पाटील, पि.के.पी.एस. संघाचे सी.ई.ओ, आर. टी. चौगुला, अरिहंतचे प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापुरे, कारखान्याचे सीईओ राजेश कार्वेकर, टेक्निकल मॅनेजर बी. के. स्वामी, वसंत भिक्कु, प्रदीप खोत, रोहित पाटील, संदीप पाटील यांच्यासह  स्पेलिंगचे पदाधिकारी उपस्थित होते. सुभाष शिरदवाडे  यांनी सर्वांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *