Sunday , September 8 2024
Breaking News

तारांगणतर्फे १० कर्तृत्ववान महिलांचा कौतुक सोहळा

Spread the love


डॉ. ग्रीष्मा गिजरे यांचे व्याख्यान

बेळगाव : महिलांचे लाडके व्यासपीठ तारांगण, अखिल भारतीय साहित्य परिषद व जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्वाचा कौतुक सोहळा हा कार्यक्रम गुरुवार दिनांक २४ मार्च २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता डॉ. शकुंतला गिजरे सभागृह, सरस्वती वाचनालय कोरे गल्ली या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात बेळगाव सीमाभागातील १० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होणार आहे. घर संसार सांभाळून सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला आहे. समाजामध्ये जागृतीचे कार्य केले आहे. अशांचा सन्मान होणार आहे. नुकताच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये बेळगावच्या आशा पत्रावळी यांची विश्वविक्रमाची नोंद झालेली आहे यांचादेखील सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. सिंथिया फर्नांडीस, रुक्मिणी निलजकर, सुधा भातखंडे, लता पावशे, ज्योती बामणे, प्रा.मनीषा नाडगौडा, श्रद्धा हेरेकर, जयश्री पाटील, सुरेखा पाटील, सिमरन गौंदळकर या सत्कार मूर्ती आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ग्रीष्मा गिजरे, डॉ. मंजुषा गिजरे, प्रा. स्वरूपा इनामदार उपस्थित राहणार आहेत.
आजकालच्या महिलांच्यासाठी वंधत्व हा एक आजार वाढीस लागला आहे. आणि हा या वंधत्व वाढीस कोणकोणती कारणे आहेत ती महिलांच्या जीवनावर कशा पद्धतीने परिणाम करतात. यावर डॉ. ग्रीष्मा गिजरे यांचे व्याख्यान होणार आहे. वंधत्वावर उपचार पद्धती कोणती आहे याचेही मार्गदर्शन डॉ. ग्रीष्मा गिजरे या करणार आहेत

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *