Saturday , October 19 2024
Breaking News

इदलहोंड ग्राम पंचायतच्यावतीने नुतन कमानीचे उद्घाटन

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतच्यावतीने १४ व्या वित्त आयोग निधीतून जवळपास २ लाख ५३ हजार रूपये खर्चून बेळगाव- पणजी महामार्गाजवळील इदलहोंड क्राॅसवर इदलहोंड गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर कमान उभारण्यात आली आहे.
या कमानीचे उद्घाटन सोमवारी दि. ९ रोजी पार पडले.
याप्रसंगी इदलहोंड ग्राम पंचायत अध्यक्ष चांगापा बाचोळकर आणि ग्राम पंचायतीचे पीडीओ बळीराम कृष्णा देसाई यांच्या हस्ते फित कापून नुतन कमानीचे उद्घाटन केले.
या कमानीच्या उद्घाटन कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य उदयराव पाटील, यल्लापा होसुरकर, भोमाजी यळ्ळूरकर, परशराम कुंभार, सदस्या लक्ष्मी सुतार, सुमन कोलकार तसेच या भागातील नागरीक म्हात्रू धबाले, ग्राम पंचायतीचे कर्मचारी वर्ग, कंत्राटदार नागाप्पा बाबीचे, मेस्त्री रमेश होनगेकर, रंगकाम केलेले यल्लापा कदम, तसेच इदलहोंड ग्राम पंचायतीच्या हद्दीतील विविध गावचे नागरिक उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील यांनी ही भेट देऊन कमानीच्या कामाबदल समाधान व्यक्त केले. ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्याच्या कामाचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

Spread the love  बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *