Monday , September 21 2026
Breaking News

गर्लगुंजी गावची ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या यात्रेला प्रारंभ

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावची प्रसिद्ध ग्राम देवता श्री माऊली देवीची यात्रा मंळवारी दि. १० ते शुक्रवारी दि. १३ पर्यंत होणार आहे.
मंगळवारी दि. १० रोजी सकाळी गावातील विविध देवदेवतांची पुजा आर्चा होऊन सायंकाळी ४ वाजता मानकऱ्यांच्या देवघरातून पालखी वाद्याच्या नादात माऊली मंदिराकडे प्रयाण केले.
यावेळी माऊली देवीला अभिषेक, विधिवत पुजा, मानकऱ्यांच्या हस्ते गाऱ्हाणा घालून यात्रेची सुरूवात होते.
बुधवारी दि. ११ रोजी पहाटे सुवासिनी गावातून आरती घेऊन माऊली मंदिराकडे जातात. श्री माऊली देवीची पुजाऱ्यांच्याहस्ते विधिवत पुजा होऊन सकाळी सुवासिनीच्या इंगळ्या न्हाण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ होतो. त्यानंतर भाविक माऊली देवीचे दर्शन घेऊन ओटी भरतात व नवस फेडतात. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
बुधवारी रात्री ९ वाजता करमणूकीचे कार्यक्रम म्हणून माऊली नाट्यमंडळ यांच्यावतीने सुडाची आग हा सामाजिक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
गुरूवारी दि. १२ रोजी भाविकांच्या करमणूकीचे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.
तर शुक्रवारी दि. १३ रोजी श्री माऊली देवीच्या यात्रेची सांगता होऊन सायंकाळी पालखी वाद्याच्या नादात गावाकडे प्रयाण होईल.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *