Sunday , September 22 2024
Breaking News

चव्हाट गल्ली येथील बृहत मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहरातील अनिल बेनके फाउंडेशन आणि केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बृहत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज चव्हाट गल्ली येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.

चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जागतिक डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टरांना शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत व प्रास्ताविक झाल्यानंतर बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार बेनके यांनी जागतिक डॉक्टर्स डे निमित्त शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व डॉक्टरांचा गुलाब पुष्प देऊन गौरव केला. चव्हाट गल्ली येथील आजच्या या शिबिरात सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, डोळे, त्वचा, कान, घसा, रक्तदाब, मधुमेह यासारख्या अनेक तपासण्या करण्यात आल्या.

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल मधील जेष्ठ डॉक्टरांनी शिबिरात सहभागी नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून सल्ला देण्याबरोबरच औषधही मोफत दिली. या शिबिराचा चव्हाण गल्ली परिसरातील बहुसंख्या नागरिकांनी लाभ घेतला. अनिल बेनके फाउंडेशन आणि केलेली डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्यातर्फे आठवड्याच्या प्रत्येक रविवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात एकूण 14 ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
तरी या शिबिरांचा संबंधित भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळवट्टीत ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्तांचा सत्कार

Spread the love  बेळगाव : बेळवट्टी – बाकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *