Saturday , September 21 2024
Breaking News

पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत आवाज उठवावा!

Spread the love
फिरोज चाऊस : दोशी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात दहावी परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे सदस्य प्रशांत गुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे अध्यक्ष फिरोज चाऊस होते.
फिरोज चाऊस म्हणाले, विद्यार्थ्यांना या विद्यालयात शिकायला मिळाले हे त्यांचे सुभाग्य आहे. कारण येथे अभ्यासक्रमा बरोबरच इतर अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. पुढील काळात सर्वांनी पर्यावरणाबद्दल खूप जागरूक राहिलं पाहिजे. व त्याच्या ऱ्हासाबद्दल आवाज उठवला पाहिजे. सिंगलयुज प्लास्टिक वापर टाळला पाहिजे.
जनता शिक्षण मंडळाचे सदस्य प्रशांत गुंडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी थोड्याशा अपयशाने खचून न जाता  सातत्याने प्रयत्न करुन आईवडिलांचे नाव उज्ज्वल करावे. प्रत्येकांनी आपल्या जीवनात वृक्ष जतन करण्याचे कर्तव्य निभवावे.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रणाली सातवेकर, पूजा गुंडाळे, सानिका पावले, सार्थक कानडे, श्रेया पाटील, स्वरूप भादुले, अंजली पाटील, रेवती खोत, सोनिया कांबळे, प्रथमेश बोधले, साई बाचणे, प्रमोद खवरे, साईराज कुंभार, संस्कार पाटील, शुभम सूर्यवंशी, अनुराग यादव, राजनंदिनी ढगे, रिद्धी कुलकर्णी, ऋचा हंशेट्टी, सानिया हवालदार, श्रुती जाधव, मयुरी खाडे, या विद्यार्थ्यांचा दहावी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल रोप देऊन सत्कार करण्यात आला
प्रारंभी मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी स्वागत केले. एस. एम. चौगुले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
अंजली पाटील, पूजा गुडाळे या विद्यार्थिनींनी मनोगतातून आपले अनुभव सांगितले. तर पालक सुभाष भादोले यांनी मनोगतातुन शाळेचे आभार मानले. कार्यक्रमास एस. बी. पाटील, आर. एस. भोसले, आर. डी. देसाई, शिक्षकप्रतिनिधी  एस. एस. सांडगे, कर्मचारी प्रतिनिधी सज्जन कांबळे यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना व कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा प्रतिभाभाभी शाह, डॉ. तृप्ती शाह यांच्यासह सर्व संचालक पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले.
एस. बी. यादव यांनी सूत्रसंचालन केले. आर. एस. भोसले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या

Spread the love  डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उ‌द्घाटन निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *