Saturday , September 21 2024
Breaking News

फौजदार नियुक्ती घोटाळा करणार्‍यांची गय नाही

Spread the love

गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र : निपाणीत पोलीस कार्यालय इमारतींचे उद्घाटन
निपाणी (विनायक पाटील) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने हे स्थळ शक्तिशाली बनले आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस समाजव्यवस्था सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यांच्या कार्यालयासह निवासस्थानाची वानवा होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आपण राज्यभरात कोट्यावधी रुपये मंजूर करून 100 नव्या इमारतीसह कर्मचार्‍यांना घरकुलाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. फौजदार घोटाळा चौकशी अंतिम टप्प्यात असून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे असे मत राज्याचे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी व्यक्त केले.
येथील शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नव्या कार्यालय इमारतींचे उद्घाटन मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत करून ते बोलत होते.
गृहमंत्री ज्ञानेंद्र म्हणाले, काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत वर्षाकाठी केवळ चार ते पाच इमारती बांधल्या जात होत्या. पण आपण ही संख्या वाढवली आहे. शिवाय अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी सर्व सुविधांनी युक्त घरे बांधून दिली आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एफएससी लॅबची निर्मिती करून पोलीस तपास कार्यात आधुनिकता आणली आहे. तसेच कर्नाटकात त्याची युनिव्हर्सिटी व्हावी, यासाठी आराखडा पाठवला आहे. राज्यात सायबर क्राईम वाढत असून त्याला विशेष कार्यालय सुरू करून तज्ञाद्वारे पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. शिवाय महिला साठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण केली आहेत. यापुढील काळात कोणत्याही गुन्ह्याबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांना पोलिस ठाण्याला द्यावे लागणार नसून 112 क्रमांकाच्या वाहनाला केवळ अर्ध्या तासात पोलीस घटनास्थळी भेट देऊन तक्रारींची दखल घेतली जाईल. फौजदार नियुक्ती परीक्षाच्या घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात असून दोषीवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे खर्‍या उमेदवारांना न्याय मिळेल असा विश्वासही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.
मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, येथील पोलिस ठाण्याच्या कार्यालयाचे दुरवस्था पाहून नवीन कार्यालय मंजूर करून त्याचे बांधकामही पूर्ण झाले. त्यामुळे त्याचे लोकार्पण केले असून अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची सोय झाली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे इमारतीसाठी जागेची कमतरता होती. आता नगरपालिकेने ती पूर्ण केले असून लवकरच या ठाण्याची नवीन इमारत होणार आहे. याशिवाय हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरणही केले जाणार आहे. महापूर आणि कोरोना काळातही निपाणी पोलिसांनी संकट काळात चोखपणे आपली सेवा बजावली आहे. शहरात 56 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून यापुढील काळात गुन्ह्यांच्या घटनांना आळा बसणार आहे.
प्रारंभी गृहमंत्री ज्ञानेंद्र यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले. त्यानंतर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आले.
यावेळी बी. एस. बसवराज, हालशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा निता बागडे, सभापती राजू गुंदेशा, नगरसेवक संतोष सांगावकर, सागर मिरजे, पप्पू पाटील, सुरेश शेट्टी, सद्दाम नगारज, अभय मानवी, प्रणव मानवी दादाराजे देसाई-निपाणकर, गटशिक्षणाधिकारी रेवती मठद, डी. बी. सुमित्रा, तहसीलदार डॉ. मोहन भस्मे,शिवसिंंग रजपुत, नगरसेविका उपासना गारवे, दिपाली गिरी, सोनाली उपाध्ये हर्षा शेट्टी, महादेव चव्हाण, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्यासह आजी माजी नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांनी आभार मानले.
————————————————————————————————
निपाणी पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद
निपाणी आणि चिक्कोडी भागात पोलिसांच्या कर्तव्यदक्ष त्यामुळे क्राईम रेट अत्यंत कमी आहे. आता यापुढील काळात नवनवीन तंत्रज्ञान विकसित केल्याने समाजातील गुन्हेगारी संपुष्टात येईल, असे सांगून गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी निपाणी पोलिसांचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या

Spread the love  डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उ‌द्घाटन निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *