Monday , September 21 2026
Breaking News

जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राईड सहेलीच्यावतीने उड्डाण पुलाची स्वच्छता

Spread the love

बेळगाव : समाजाचे प्रती आपलेही काही तरी कर्तव्य आहे हे समजून जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राईड सहेली सर्व कार्यकर्त्यांनी आज उड्डाण पुलाची स्वच्छता केली.
आज सकाळी उड्डाण पुलावर जमला कचरा व पुलावर उगवलेले काँग्रेस गवत तसेच अनेक विषारी वनस्पती ज्याचा धोका सकाळी मॉर्निंग वॉकला येणार्‍या नागरिकांना तसेच वाहनधारकांना होत होता. कोणाला त्यामुळे काही अपायकारक घटना होण्याअगोदरच प्राईड सहलीच्या सर्व सदस्यांनी उड्डाणपुलावरील काँग्रेस गवत व विषारी वनस्पती काढल्या. या वनस्पतीमुळे पुलाला सुद्धा धोका पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राईड सहेली सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र जमून तेथील कचरा महापालिकेच्या वाहनात भरून पाठवून देण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *