Saturday , September 21 2024
Breaking News

उचगांवच्या शेतकऱ्यांनी रिंगरोडच्या विरोधात सुनावणीत नोंदविले आक्षेप

Spread the love

 

कोणत्याही परिस्थितीत सुपिक जमिन देणार नाही

बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील सुमारे 1272 एकर सुपिक जमीन बेळगावच्या सभोवताली रिंगरोड करण्यासाठी भूपसंपादन करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डाव आखला आहे. सदर भूसंपादनाच्या विरोधात सुमारे 865 शेतकऱ्यांनी आपले लेखी आक्षेप नोंदविले आहेत.

आज रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार्फत उचगांव येथील शेतकऱ्यांना सुनावणीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी सदर कार्यालयात उपस्थित राहून आपले – आपले वैयक्तिक आक्षेपपर म्हणणे मांडून आमची जमीन कोणत्याही परिस्थितीत देणार नाही असे ठणकावून सांगितले. यावेळी भूसंपादन अधिकारी अनुराधा वस्त्रद यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी समितीचे युवा नेते ॲड. सुधीर चव्हाण, ॲड.एम. जी. पाटील, ॲड. प्रसाद सडेकर, बी. एस. होनगेकर , लक्ष्मण होनगेकर, मनोहर होनगेकर यासह शेतकरी वर्ग उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठी भाषा व रोजगाराच्या दिशा यावर उद्या चर्चा

Spread the love  बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालय, बेळगाव येथे रविवारी (ता.२२) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *