Saturday , September 21 2024
Breaking News

निपाणीकरांच्या आरोग्यासाठी प्रयत्नशील!

Spread the love

 

आमदार शशिकला जोल्ले : ‘आमचा दवाखान्याचे’ उद्घाटन

निपाणी (वार्ता) : मागासवर्गीय भागात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ‘आमचा दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच त्याचा उपयोग होणार असून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे. यापूर्वी अर्बन हेल्थ सेंटर सुरू करून आरोग्य सुविधा दिल्या आहेत. येथील महात्मा गांधी रुग्णालयातील ३० खाटांचे आता लवकरच १०० खाटामध्ये रूपांतर होणार आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील सर्वसामान्य रुग्णांची सोय होणार असल्याचे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. येथील संभाजीनगर मधील टीचर्स कॉलनीमध्ये कर्नाटक सरकार आरोग्य विभाग, बेळगाव जिल्हा कुटुंब कल्याण विभाग, बेळगाव जिल्हा पंचायत, चिकोडी समुदाय आरोग्य केंद्र आणि निपाणी नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आमचा दवाखाना’ उद्घाटनाप्रसंगी आमदार जोल्ले अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार जोल्ले यांच्या हस्ते ‘आमच्या दवाखान्याचे’ उद्घाटन झाले.
आमदार जोल्ले म्हणाल्या, आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याने त्यासाठी तात्काळ उपचार होणे गरजेचे आहेत. माता आणि शिशुंचे मृत्यू प्रमाण घटनेसाठी साडेआठ कोटी रुपये खर्चून हायटेक माता शिशु रुग्णालय सुरू केले आहे. याशिवाय कामगारांसाठी इएसआय दवाखाना सुरू केला आहे. त्या माध्यमातून लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया मोफत केला जात आहेत. बंद पडलेल्या सरलाबाई दवाखाना सुरू करून जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून दोन वर्षापासून सर्वसामान्य महिलांची प्रसूती होत आहे. आतापर्यंत ९८ महिलांची नैसर्गिक प्रसूती झाली आहे. गांधी हॉस्पिटलमध्ये लवकरच डायलेसिस सुविधा आणि ट्रामा केअर, टी.बी. या
वरही सुविधा उपलब्ध होण्यासाठी सांगितले.
तालुका वैद्याधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे यांनी, उपनगरातील सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना या दवाखान्याचा चांगला लाभ होणार आहे. या दवाखान्यांमध्ये बारा सेवा उपलब्ध होणार आहेत. उर्दू नागरिकांना त्याचा आधार मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याला दंत आणि डोळे तपासणी शिबिर घेणार असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, सुभाष डांगरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी डॉ. सीमा गुंजाळ यांनी स्वागत केले.
कार्यक्रमास उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, नगरसेवक संतोष सांगावकर, सोनाली उपाध्ये, प्रणव मानवी, विकास वासुदेव, दादाराजे देसाई- निपाणकर, डॉ. ईश्वर पत्तार, डॉ. शितल कुलकर्णी, बंडा घोरपडे, शंकर वर्मा, शिवाजी भिलुगडे, दीपक माने, एम. बी. चौगुले, दादासाहेब संकाजे, राहुल खोत, प्रसाद पारळे, बी. एस. जाधव, डॉ. संतोष गाणीगेर, अर्चना पाटील, संजना घाटगे, उदय नाईक, यांच्यासह संभाजीनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते. डॉ. गणेश चौगुले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या

Spread the love  डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उ‌द्घाटन निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *