Saturday , September 21 2024
Breaking News

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा विद्युतभारीत तारेच्या स्पर्शाने मृत्यू

Spread the love

 

खानापूर : मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा विद्युतभारीत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी दुपारी तीनच्या सुमारास खानापूर तालुक्यातील मेंढेगाळी मलवाड दरम्यान कुलमवाडा नजिक घडली आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव मारुती गोविंदप्पा वडर असे असून तो हल्ल्याळ तालुक्यातील अंत्रोळी गावचा रहिवासी आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, हल्ल्याळ तालुक्यातील अंत्रोळी गावचा रहिवासी हलशी येथे आपल्या नातेवाईकाच्या घरी गेला होता त्याला खेकडे पकडायचा छंद अधिक होता. त्यामुळे अन्य काहींच्या समवेत तो मेंढेगाळी मार्गे कापोली ग्रामपंचायत क्षेत्रातील कुलमवाडा भागात असलेल्या शेततळीत गुरव नामक एका शेतकऱ्याच्या शेतातून जात असताना जंगली जनावरांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या हायबॅक्स तारेला स्पर्श झाल्याने तो जागीच ठार झाला. त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला जोराचा झटका लागताच बाजूला फेकला गेला म्हणून बचावला. शेतकरी अलीकडे पिकांचे संरक्षण करण्यासाठी झटका करंट अर्थात हायबॅक्स लावून शेती पिकाचे संरक्षण करत आहेत. पण या ठिकाणी त्या झटका करंट अर्थात हायबॅक्स तारेला कुठून तरी विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने त्या व्यक्तीला जोराचा झटका बसल्याने तो जागीच ठार झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण विद्युतभारित तारेचा स्पर्श त्या झटका करंट तारेला स्पर्श कसा झाला याची माहिती उपलब्ध झाली नाही. घटनास्थळी हेस्कॉम खात्याचे सहाय्यक अधिकारी चक्रिमठसह आदी अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या श्रावणी पाटील हिची निवड

Spread the love    खानापूर : जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी भरणानी पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *