Friday , October 18 2024
Breaking News

कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका

Spread the love

 

नवी दिल्ली : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठिकठिकाणा आंदोलन सुरु केली आहेत.

शेतकरी आक्रमक, अनेक बाजार समित्यात कांद्याचे लिलाव बंद
केंद्र शासनाकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा घेतला निर्णय घेतला आहे. या निर्णयावर शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर लासलगाव, मनमाड, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यात कांद्याचे लिलाव बंद आहेत. नाशिकच्या उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई – आग्रा महामार्ग रोखला आहे. दिल्लीतील बाजारात स्थानिक विक्रेते 70 ते 80 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री करत आहेत. मात्र, आता निर्यातबंदी केल्यानं दरात घसरण होण्याची शक्यता आहे. आजच्या निर्णयापूर्वी केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने कांदा देण्याचा निर्णाय घेतला होता. एकीकडे अवकाळी आणि गारपिटीनं बळीराजा होरपळला आहे. शेतकऱ्याला हिवाळी अधिवेशना दरम्यान आर्थिक मदत होईल आणि दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकरी वर्गात पुन्हा नाराजी पसरली आहे. अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ मुळवी आणि मानसी जामसंडेकर यांना ‘अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार’

Spread the love  मोरणा कवी कट्टा समूह सांगली, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने “माय मराठी: अभिजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *