Monday , September 21 2026
Breaking News

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

Spread the love

 

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागली. आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमधील तळवडे एमआयडीसीत असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला आग लागली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, असंही म्हटलं जात आहे.

काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवलं आहे. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे. वाढदिवसाल्या लावण्यात येणाऱ्या स्पार्कल्सचा हा कारखाना होता. या लागलेल्या आगीत कारखान्यातील वस्तू जळून खास झाल्या आहेत.

काय म्हणाले पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह?
या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे वाढदिवसाच्या केक वर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *