Friday , October 18 2024
Breaking News

गॅस गळतीने पुलाची शिरोली परिसरात घबराट

Spread the love

 

शिरोली एमआयडीसी : पुणे- बेंगळुर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बायोगॅस घेवून जाणाऱ्या ट्रकमधील अचानक गॅस गळती सुरु झाली. यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली. गॅस हवेत पसरून दुर्गंधी पसरली तर स्फोट होईल या भितीने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. गॅसच्या दुर्गंधीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज काही काळ थांबविण्यात आले.
बत्तीस शिराळा येथून बायोगॅसच्या टॉक्या भरून कागल येथील एका खासगी कंपनीत घेवून चाललेला ट्रक (क्र. एम एच १० सी आर २९०६) हा शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर आला. यानंतर ट्रकमधील काही बायोगॅस टाक्यांचा व्हॉल निकामी झाल्याने मोठा आवाज होत गॅस हवेत मिसळू लागला. हवेत गॅस मिसळून त्याचा स्फोट होईल? या भितीने परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेले रूग्ण व डॉक्टर यांनी रुग्णालयातून बाहेर पडत पटांगणात धाव घेतली. गॅस दुर्गंधीमुळे डॉक्टरांचे कामकाज काही काळासाठी थांबवण्यात आले. कारण गॅसची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात परिसरात पसरली होती. काही रूग्ण उपचारापूर्वीच घरी निघून गेले. घटनास्थळी गॅस गळती रोखण्यासाठी कंपनीचे व स्थानिकांनी नागरिकांनी धाव घेवून गॅस गळती रोखली. गॅस गळतीमुळे महामार्गवरील वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती.

About Belgaum Varta

Check Also

भाजपकडून छत्रपती शिवरायांच्या विचारांचे संविधान संपवण्याचा प्रयत्न : राहुल गांधी

Spread the love  कोल्हापुरात राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोल्हापूर : हिंदुस्थानात दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *