Sunday , September 8 2024
Breaking News

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरद्वारा खास योजना!

Spread the love

 

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती वतीने विद्यार्थ्यांना आवाहन..

बेळगाव : शिवाजी विद्यापीठामध्ये आगामी शैक्षणिक वर्षात येथील आर्ट्स, कॉमर्स, सायन्स इत्यादी पदव्यूत्तर अधिविभागात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातून प्रवेशित अशा विद्यार्थी वृंदास शैक्षणिक शुल्कात 100% सूट तसेच वसतिगृह शुल्क माफी असणार आहे. तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कात 25% सवालत आणि वसतिगृह शुल्क माफी ची तरतूद आहे.
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेतल्या जातात. त्या बाबत योग्य वेळी आपणास सूचित केले जाईल.
तथापि सध्या विशेष सूचना अशी की, विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी या अंतर्गत बी.टेक, एम.टेक. तसेच पीएचडी हे इंजिनिअरिंग मधील कोर्सेस राबवले जातात. या पैकी बी. टेक. व एम. टेक. या कोर्सेस ना प्रवेश मिळवण्यासाठी एमएचटी-सीईटी सेल महाराष्ट्र शासन ही प्रक्रिया राबवते. खासकरून B. Tech प्रवेशा करिता MHT-CET मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. या प्रवेश परीक्षेच्या आधारावर महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील ज्या विद्यार्थ्यांना डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विविध अभ्यासक्रमाना प्रवेश मिळेल त्या विद्यार्थ्यांना वरती नमूद सवलतीचा लाभ घेता येईल. तरी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील पी. यू. सि. मॅथ्स सहित सायन्स (बारावी) परीक्षेसाठी बसत असलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासन घेत असलेली MHT-CET परीक्षा देणे गरजेचे (अनिवार्य) आहे. सदर परीक्षेचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक १ मार्च २०२४ आहे. त्यापूर्वी बारावी (पी. यू. सी) सायन्स मॅथ्स ग्रुप विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरावा/ रजिस्ट्रेशन करावे. परीक्षा दिल्यानंतर त्यांना प्रवेश मिळाला तर या सवलतींचा लाभ घेता येईल.

परीक्षेच्या नाव नोंदणीसाठी खालील दिलेल्या लिंक चा वापर करावा:
http://surl.li/qrevw

सीमाभागातील विद्यार्थ्यांनी याबाबत वेळेमध्ये अर्ज करून लाभ घ्यावा, असे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती वतीने आवाहन करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *