शिक्षक नामदेव चौगुले यांचा उपक्रम; कुरलीतील मंडळांनी लावली रोपे
निपाणी (वार्ता) : शहरासह ग्रामीण भागात अनेक मंडळाकडून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात आकर्षक विद्युत रोषणाई, महाप्रसाद वाटपासह डॉल्बी, डीजे लावून लाख रुपये खर्च केले जातात. ही बाब गांभीर्याने घेऊन निपाणी येथील पर्यावर प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी कुरली येथील इशारा गणेश उत्सव, सांस्कृतिक मंडळाला यावर्षी ५० रोपांची भेट दिली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ही रोपे लावून समाजात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
कुरली येथील इशारा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ गेली ३२ वर्षे समाजोपयोगी कार्य करत आहे. सणसमारंभ साजरे करत असताना तरुणाईला नवी दिशा देण्याचे कार्य करीत आहे. स्वमालकीची इमारत निर्मिती करून नागरिकांच्या मनात एक आदर्श निर्माण केला आहे. यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करताना दिवंगत यशवंत देसाई, दिवंगत सदाशिव कोकणे यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पर्यावरणप्रेमी शिक्षक व सृष्टी पर्यावरणवादी संघटना संचालक नामदेव चौगुले, अजित पाटीलयांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी नामदेव चौगुले यांनी इशारा ग्रुपचे कार्य आदर्शवत असलेचे सांगितले. अजित पाटील यांनी वृक्षसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे नमूद केले. नामदेव चौगुले यांनीमान्यवरांना वृक्षरोपे भेट दिली.
कार्यक्रमास रणजित गोरे, अजित पाटील, गणेश माळी, संदीप माळी, अमोल पाटील, संतोष पाटील, सागर चौगुले, सागर गुरव, अनिल वठारे, सुनील वठारे, रवींद्र कोरवी, तुकाराम कांबळे, नंदकुमार गोड्याप्पा, तुषार दिवटे, सौरभ कोकणे, रितेश चौगुले, लखन चौगुले, पांडूरंग डोंगरे, तुकाराम कांबळे, सागर चौगुले, सागर गुरव, सुरज मगदूम, बाळीशा हेरवाडे, रोहन कोरवी, ओंकार चौगुले, पराग चौगुले, धनराज चौगुले, अदित्य चौगुले, सोहम वैराट, रोहीत बोराडे, भगवान भानसे, पवन चौगुले, रोहीत वैराट, यश सुतार, प्रकाश दिवटे यांच्यासह इशारा सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तानाजी दिवटे यांनी आभार मानले.