Friday , October 18 2024
Breaking News

येळ्ळूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेकडून शिवस्मारकाचा अहवाल ग्रामस्थांसमोर सादर

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूरमध्ये हिंदवी स्वराज युवा संघटना व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून 25 फेब्रुवारी 2024 रोजी शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज श्री संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते अश्वारूढ शिवमूर्तीचे लोकार्पण झाले होते. त्या खर्चाचा लेखाजोखा हिंदवी स्वराज युवा संघटनेकडून येळ्ळूर ग्रामस्थांसमोर विजयादशमीच्या निमित्ताने ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीच्या प्रांगणात सादर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर हे होते. तर पाहुणे म्हणून येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, चांगळेश्वरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण कंग्राळकर, त्याचबरोबर हिंदवी स्वराजयुवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन नारायण कंग्राळकर यांच्या हस्ते झाले. तर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, प्रशांत मजुकर व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकामध्ये बोलताना प्रशांत मजुकर म्हणाले, येळ्ळूर व परिसरातील शिवभक्तांच्या सहकार्यामुळेच येळळूर गावच्या मधोमध लक्ष्मी चौकात भव्य अशा अश्वारूढ शिवमुर्तीची उभारणी करणे शक्य झाले. या कामासाठी येळ्ळूरमधील सर्व पतसंस्था, संघटना, भजनी मंडळे गणेश मंडळे, रिक्षा, टेम्पो व ट्रॅक्टर संघटना, महिला मंडळे, कामगार वर्ग, अभियंते, उद्योजक व सामान्य नागरिक या सर्वांनीच देणगी देऊन व श्रमदानाच्या स्वरूपात सहकार्य केले त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. यावेळी प्रा. सी. एम. गोरल यांनीही संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अहवालाच्या माध्यमातून कामाची पारदर्शकता लोकांसमोर मांडली याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील म्हणाले, हिंदवी स्वराज युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये ऐतिहासिक असे काम केले असून, गावामध्ये अश्वारूढ शिवमुर्तीची उभारणी करून इतिहास निर्माण केला आहे, संघटनेचे सचिव चांगदेव मुरकुटे यांनी शिवस्मारकाचा जमा खर्च नागरिकासमोर सादर केला. त्यामध्ये शिवस्मारकासाठी एकूण वर्गणी जमा 50 लाख 50 हजार 898 रुपये, एकूण खर्च 39 लाख 89 हजार 165 रुपये. तर संघटनेकडे एकूण शिल्लक 10 लाख 61 हजार 733 रुपये ही रक्कम शिवस्मारकाच्या पुढील देखभालीसाठी वापरण्यात येणार आहे. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांचाही गुलाब पुष्प व पांढरी टोपी देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रत्येक गल्लीतील शिवस्मारकासाठी वर्गणी जमा करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सन्मानचिन्ह, पांढरी टोपी, व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. तर संघटनेचे कार्यकर्ते अनिल पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *