Thursday , November 14 2024
Breaking News

कॉंग्रेस सरकार हटवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही : माजी पंतप्रधान देवेगौडांचा इशारा

Spread the love

 

बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस सरकार हटवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा धजद सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शुक्रवारी दिला. काँग्रेस सरकारची त्यांनी जोरदार निंदा केली.
आज चन्नपट्टण मतदारसंघातील रामपूर गावात एनडीएचे उमेदवार निखिल कुमारस्वामी यांच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना देवेगौडा म्हणाले, “मी या सरकारवर कधीच बोललो नाही. त्याची लूट पाहून कालपासून बोलतोय, असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना माजी पंतप्रधानांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नातू निखिल कुमारस्वामी चन्नपट्टणममधून निवडणूक लढवत असल्यामुळे उतरत्या वयातही मी प्रचारासाठी आलो आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. पुढील निवडणुकीतही मी पक्षाच्या उमेदवारांसाठीच लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख राज्यावर राज्य करणाऱ्या दोन महान नेत्यांनी केला आहे. त्यांच्या पाच हमी योजनांपैकी चार हमी योजना डळमळीत आहेत. हे मी म्हणत नाही. त्यांचेच कॅबिनेट मंत्री सांगत आहेत. तिजोरीत पैसे का नाहीत? या सरकारमध्ये सगळेच खाऊन-पिऊन आहेत, अशी टीका त्यांनी केली.
महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळ घोटाळ्यावर प्रकाश टाकत त्यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने वाल्मिकी समाजाचा पैसा घेतल्याचा आरोप केला.
देवेगौडा यांनी आरोप केला आहे, की शिवकुमार यांनी या वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीत पैशाच्या शक्तीचा वापर करून मंड्यामध्ये त्यांचा मुलगा आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला.
“हे सरकार संपेपर्यंत मी लढेन… मी ९२ वर्षांचा आहे याचा अर्थ असा नाही की माझा नातू निखिल कुमारस्वामी जिंकल्यानंतर मी घरी झोपेन. नाही, असे सरकार मी माझ्या ६२ वर्षात पाहिले नाही. हे राज्य वाचवायचे आहे. हे सरकार हटवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे माजी पंतप्रधान म्हणाले.
देवेगौडा म्हणाले की, धजद हा प्रादेशिक पक्ष एनडीएमध्ये सामील झाला, कारण इंडिया आघाडीत पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरीचा नेता नाही.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबद्दल बोलताना देवेगौडा म्हणाले, की मोदी आणि ट्रम्प यांचे चांगले संबंध आहेत आणि ते देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि चीन आणि इतर शत्रूंचा सामना करण्यासाठी फायदेशीर ठरेल.
चन्नापटना पोटनिवडणूक ‘डीके’ (शिवकुमार) आणि ‘एचडीके’ (एचडी कुमारस्वामी) यांच्यातील लढत म्हणून चित्रित करणाऱ्या माध्यमांना उत्तर देताना देवेगौडा म्हणाले की त्यांच्यात तुलना करता येणार नाही.
लोकांच्या फायद्यासाठी कुमारस्वामींनी रामनगरला जिल्हा बनवला. पण ते आपल्या फायद्यासाठी बंगळुरला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची (डीके) कुमारस्वामी यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
धजदने केवळ दोन जागा जिंकल्या असल्या तरी पंतप्रधान मोदींनी कुमारस्वामी यांना केंद्रातील दोन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली आहे. कुमारस्वामी यांनी अशी जबाबदारी घेण्याचे व्यक्तिमत्त्व विकसित केले आहे, असे ते म्हणाले.
निवडणूक प्रचारादरम्यान नातू आणि मुलाने अश्रू ढाळल्याबद्दल शिवकुमार आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या टिप्पण्यांना उत्तर देताना गौडा म्हणाले, “डीके यांना कोणी अश्रू ढाळताना पाहिले आहे का?” कोतवाल रामचंद्र (दरोडेखोर) यांच्याकडे शंभर रुपयांसाठी काम करू लागलेले ते (शिवकुमार) पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला. त्यांनी कधी अश्रू ढाळले आहेत का? मला दाखवा” ते म्हणाले.

आमचे सरकार हरभऱ्याचे रोप नाही – शिवकुमार
देवेगौडा यांच्या रामनगरातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, कुमारस्वामी हे माजी मुख्यमंत्री आहेत, माजी पंतप्रधानांचे पुत्र आहेत, मी एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझी आणि कुमारस्वामी यांची तुलना होऊ शकत नाही. ते (कुमारस्वामी) हिमालय, मी जनतेचा प्रामाणिक सैनिक आहे, अशी त्यांनी उपहासात्मक प्रतिक्रीया दिली.
सरकार हटवण्याबाबत देवेगौडा यांच्या टिप्पण्यांना उत्तर देताना शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिले, “…हे हरभऱ्याचे रोप नाही जे सहज उपटून टाकता येईल….ते १३६ आमदारांचे मजबूत सरकार आहे. ते लोकशाही पद्धतीने जनतेने निवडून दिलेले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय महामार्गावर घटप्रभा नदीपात्रात कोसळला ट्रक

Spread the love  बेळगाव : संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुणे- …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *