आजरा : मलिग्रे ता. आजरा येथील अंगणवाडी व महिला बचत गटाच्या वतीने आयोजित महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने विधवा महिला शितल साईनाथ बुगडे, या सौभाग्य अलंकार व कुंकू याचा धाडसाने वापर करतात. यासाठी त्यांचा मलिग्रे सरपंच शारदा गुरव याच्या हस्ते विशेष सत्कार करणेत आला. विशेषतः ८ मार्चला शितल बुगडे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अंगणवाडी सेविका शशिकला घोरपडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महिलांना आत्मसंन्मानाची जाणीव जागृती करून, रूढी परंपरा मध्ये न अडकता, स्त्रीयांना समानतेची वागणूक देण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन केल्याचे सांगितले. मुक्ती संघर्ष समितीचे, राज्य संघटक संग्राम सावंत यांनी लखुजी जाधव यानी, आपल्या जीजामाता या मुलीला घोड्यावर बसणे, ढाल पटा चालवण्याचे शिक्षण देऊन, स्त्री पुरूष समानता, सामाजिक हक्काची जाणीव करून दिली तर जोतीबा आणि सावित्रीबाई फुले, यांनी बहूजनाचा, स्त्री मुक्ती चळवळी चा पाया घातला, याचा आदर्श मलिग्रे कर आणि शितलताईच्या कृतीशीलतेत दिसत असल्याचे सांगितले. सरपंच शारदा गुरव यांनी संविधान व स्त्री शिक्षणामुळे ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पदापर्यत सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे सांगितले महिला राजसत्ताक संस्थेच्या तालूका अध्यक्ष मंगल कांबळे यांनी मोफत विवाह नोंद व घरठाणवर दोघांची नावे आवश्यक असलेचे मत व्यक्त केले. यावेळी काॅ. संजय घाटगे, ग्रामसेवक धनाजी पाटील, नंदा पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. सुकन्या बुगडे, दुर्वां कागिनकर, दुर्वा बुगडे या मुलीनी संविधान व महिला शक्ती या विषयावर भाषणे केली. तर महिला साठी विविध स्पर्धा व संविधान जनजागृती आणि शिवचरीत्र माहिती, पोष्टर प्रदर्शन घेण्यात आले. यावेळी उपसरपंच चाळू केंगारे, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा तर्डेकर, शोभा जाधव, कल्पना बुगडे, लक्ष्मी कांबळे, शाळा कमिटी अध्यक्षा सविता कागिनकर, उपाध्यक्षा पुजा पन्हाळकर, शिवाजी भगुत्रे, संजय कांबळे, बाळू कांबळे, मुख्याध्यापक मनिषा सुतार, अपूर्वा देशपांडे, लोहार मॅडम, मदतनीस नंदा बुगडे, शोभा बुगडे, सुजाता घाटगे, मनिषा सावंत याच्या सह मातापालक व विद्यार्थी उपस्थित होते, आभार कल्पना कोरवी यानी मानले.