मलिग्रे येथे सोलर हायमास्ट उद्घाटन सोहळा संपन्न
तालुक्यातील झालेला विकास सर्वसामान्य जनतेला माहिती असून युवकांना मात्र विकासाची माहिती न देता केवळ गुटखा, मटका व व्यसनाकडे वळविण्याचे सुरू आहे. त्यासाठी युवकांना व्यसनातून मुक्त करणे व तालुक्यातील झालेल्या विकास कामांची माहिती देणे ही काळाची गरज असल्याचे मत माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. मलिग्रे येथे सोलर हायमास्ट उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील मालिकार्जुन मंदिरासमोर परिसरामध्ये कार्यक्रम पार पडला.

स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष किशोर जाधव यांनी केले. प्रास्ताविकात माजी सरपंच अशोक शिंदे यांनी ४.४१ लाखाचा सोलर हायमास्ट दिवा मलिकार्जून मंदीर परीसरात लावण्यात आल्याने, रात्रीचा हा परीसर प्रकाशित होणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आजरा साखर कारखान्यासाठी माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी नॅशनल हेविच्या माध्यमातून विशेष लक्ष घालून कारखाना तालुक्यात उभा करण्यासाठी मोठे योगदान दिले. गेल्या २५ वर्षापासून लटकलेला उचंगी प्रकल्प, पूर्ण केला आहे. यापुढे मलिग्रे गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी योजना सुरू आहे. याच्या पुर्ततेसाठी विशेष लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष सुभाष देसाई, संचालक अशोक तर्डेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आजरा कारखाना संचालक अनिल फडके, संभाजी पाटील, हात्तिवडे, राजेंद्र मुरूकटे, मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष अभय देसाई, माजी सरपंच गजानन देशपांडे, दत्ता परीट, सदाशिव माणगांवकर, शिवाजी कागिनकर, मारूती इक्के, वामन दरेकर, उत्तम पारदे, चंद्रकांत बुगडे, संभाजी बुगडे, सुनंदा बुगडे, सुमन सावंत, शोभा घोरपडे, सविता कागिनकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विश्वास बुगडे यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta