आजरा : मुमेवाडी येथील प्राथमिक विद्या मंदिर शाळेत 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. रामदास मोरवाडकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, भाषणे व विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी कु. सिद्धी विकास गाडीवडर हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ व भेटवस्तू देणेत आल्या.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी देशाच्या एकतेचा, अखंडतेचा आणि संविधानाच्या मूल्यांचा संकल्प केला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
Belgaum Varta Belgaum Varta