Wednesday , March 4 2026
Breaking News

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्याचा “आप” चा निर्धार

Spread the love

बेळगावात पार्टी कार्यालयाचे उदघाटन

बेळगाव : बेळगावमध्ये आम आदमी पक्ष कार्यालयाचे शुक्रवारी उदघाटन करण्यात आले. शनिवारखुट येथे कार्यालय उदघाटन सोहळा पार पडला.
आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक पृथ्वी रेड्डी यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी दर्शन जैन, कर्नाटक राज्य आपचे सहसचिव संतोष नरगुंद, बेळगाव जिल्हा आम आदमी पक्ष निरीक्षक तसेच पक्षाचे बेळगाव सदस्य उपस्थित होते.

आम आदमी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्य नेतृत्वाने आगामी निवडणुकांवर चर्चा केली असून त्या अनुषंगाने उमेदवारांचा शोध घेतला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
तसेच “आप “च्या नीती मूल्यांशी निगडित असलेल्या उमेदवारांनी आप अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आणि त्यांच्या संबंधित प्रभागाकरिता अर्ज करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *