Thursday , November 21 2024
Breaking News

आजरा पोलीसांची तत्परता, कोटीच्या गुन्ह्यातील हरीयाणाच्या दरोडेखोरांना केले अटक

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापरचे पोलीस अधीक्षक, शैलेश बलकवडे यांना मिळालेल्या माहितीनुसार पंजाब राज्यातील डेराबसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये जागा खरेदी विक्री व्यवसायाच्या ऑफिसवर दरोडा टाकुन व तेथील एका इसमावर गोळ्या घालून गंभीर जखमी करुन एक कोटी रुपये रक्कम लुटुन नेले. त्यांच्या सूचनेनुसार या गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई करत चौघांना पोलिसांनी आजऱ्यात ताब्यात घेतले. डेराबसी पोलीस ठाणे येथे सदर गुन्हा नोंद आहे. दिनांक १९ जून रोजी या गुन्ह्यातील चार आरोपी हे पांढऱ्या रंगाची कोरोला (गाडी क्र.एच आर ७० डी ३०८३) या गाडीतून ते पुणे बेंगलोर हायवे रोडने कोल्हापूरच्या दिशेने आलेले आहेत. त्याचेकडे हत्यारे असण्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना मिळाली. सदरची गाडी ही हायवे रोडने गोव्याचे दिशेन जात असल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी सदर आरोपीना ताब्यात घेणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना तात्काळ सुचना दिल्या.
निरीक्षक गोर्ले यांनी आजरा पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांना सदर गाडीचे वर्णन व त्यातील आरोपी यांचेकडे हत्यारे असण्याची दाट शक्यता असून योग्य ती सावधगीरी घेवुन गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्या बाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे आजरा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे व त्यांच्या पोलीस ठाण्यातील पाच अमलदार यांनी मुमेवाडी फाटा येथे नाकबंदी सुरु केली. दरम्यान त्याना दिलेल्या वर्णनाची गाडी दिसुन येताच सुनिल हारुगडे व त्यांचेकडील पथकाने अत्यंत धाडसाने सदरची गाडी आडवुन त्यांना पकडुन ताब्यात घेतले. त्यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांचे पथक घटनास्थळी पोहचले. सदरची गाडी ही हरियाणा राज्यातील असुन सदरचे आरोपी हे डेराबसी पोलीस ठाणेत दाखल गुन्ह्यातील १) अभय प्रदिप सिंग (वय २० रा. बांध ता. इश्राना जिल्हा पानिपत राज्य हरियाणा), २) आर्य नरेश जगलान (वय २० रा. इश्राना जिल्हा पानिपत राज्य हरियाणा), ३) महि बलजित झगलान (वय ३९ रा. इत्राना जिल्हा पानिपत राज्य हरियाणा), बलजित झगलान (वय ३९ रा . इत्राना जिल्हा पानिपत राज्य हरियाणा), ४) सनि कृष्ण झगलान (वय १९ रा. इश्राना जिल्हा पानिपत राज्य हरियाणा) असल्याची खात्री झाल्याने त्याना आजरा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेवुन कोल्हापूर येथे आणले व सदरचे आरोपीला पुढील योग्यत्या कारवाई करीता पंजाब येथुन आलेल्या पोलीस पथकातील डेराबसी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी ए. आय. जसकमल शेखो यांचेसह त्यांचे पथकाचे ताब्यात देण्यात आले.

आजरा पोलिसांना १० हजारांचे बक्षीस

कोटयावधी रूपयांच्या दरोड्यातील आरोपीना आजरा पोलिसांनी जेरबंद केल्याने जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या सर्वाना १० हजारांचे बक्षिस जाहिर केले.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी- दोडामार्ग घाटात गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडला, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love  चंदगड : तिलारी- दोडामार्ग घाटात कोदाळी गावच्या हद्दीत तब्बल १५ लाख रुपये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *