Tuesday , March 3 2026
Breaking News

मुमेवाडी येथे इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार!

Spread the love

 

आजरा : मुमेवाडी ता. आजरा येथील ग्राम पंचायत मुमेवाडी, शाळा व्यवस्थापन समिती व श्री. भावेश्वरी वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व सर्व पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. मनोहर दावणे सर हे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना श्री. दावणे म्हणाले की, पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित बनविल्याशिवाय त्यांचे शिक्षण थांबवू नये. मुलांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रोत्साहन देऊन स्पर्धा परीक्षेचे महत्व पटवून दिले पाहिजे. तसेच पालकांनी मुलांना आपल्या सुरक्षा कवचातुन बाहेर काढले पाहिजे तरच मुले स्वावलंबी होतील असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री. डी. के. परीट सर यांनी केले. कार्यक्रमासाठी मा. श्री. आनंदा नाईक, सौ. रुपाली कांबळे, सरपंच श्रीमती आनंदी परीट, ग्रा. सदस्या. सौ. सुरेखा पाटील, श्री. दास सर, श्री. अशोक कोळी, श्री. रामदास साठे, श्री. विजय गुरव, एकनाथ पाटील, रवींद्र कांबळे यांच्यासोबत मुमेवाडी गावातील सर्व विध्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन परीट सर यांनी केले. तर आभार श्री. वैभव कांबळे यांनी मांडले.

About Belgaum Varta

Check Also

आजरा आगारात 17 डिसेंबर रोजी “प्रवासी राजा” दिनाचे आयोजन

Spread the love  नेसरी (संजय धनके) : आजरा आगारात बुधवार दि. 17 डिसेंबर रोजी “प्रवासी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *