बेळगाव : हिरेबागेवाडी टोलनाक्यावर योग्य कागदपत्रांविना खासगी बसमधून वाहतूक करणारी दोन कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबईहून बंगळुरूकडे निघालेल्या खासगी बसची तपासणी केली असता, एफएसटी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाला सदर अवैध पैसे आढळून आले. केपी एक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली …
Read More »खानापूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच!; महिला कोट्यातून डॉ. सोनाली सरनोबत?
खानापूर : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सर्व पक्षांकडून उमेदवारी निवडीसाठी चाचपणी सुरू आहे. काँग्रेसने डॉ. अंजली निंबाळकर यांची तर निजदमधून नासीर बागवान यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. देशातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. 2018 ला थोडक्या मतांनी पराभूत झालेले …
Read More »बेळगाव ग्रामीणचे युवराज… श्रीयुत राजू एम. चौगुले!
“लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात!” असा एक वाक्प्रचार प्रचलित आहे याचाच अर्थ असा की लहान मुलं ज्या ज्या गोष्टी बालपणात करीत राहतात त्यातच त्यांचं भावी कर्तृत्व दडलेलं असतं. बेळगाव तालुक्यातील मण्णूर हे गाव, याच गावातली ही अशीच एक कहाणी आहे. ती काहणी ४९ वर्षापूर्वी म्हणजेच दिनांक ०५ एप्रिल १९७४ …
Read More »लिंगनमठजवळ चांदी, सोन्याची अवैद्य वाहतूक करणाऱ्याला अटक; नंदगड पोलिसांची कारवाई
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या लिंगनमठ गावाजवळ संशयास्पद सोन्या, चांदीची वाहतूक करत असल्याची माहिती मंगळवारी दि. ४ रोजी दुपारी १२ वाजता नंदगड पोलिसांनी मिळताच नंदगड पोलिस स्थानकाचे पोलिस अधिक्षक बसवराज लमाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगनमठ जवळ हल्याळ भागातून कक्केरीकडे जाणाऱ्या केए ६३ टी …
Read More »नरसू पाटील शिक्षण क्षेत्रातला दिशा दर्शक : साई संस्थेच्या स्नेहमेळाव्यात अभिनेते विजय पाटकर यांचे गौरवोद्गार
पनवेल : आजच्या महागाईच्या युगात कमी शुल्कात विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा दिशा दर्शक म्हणजे नरसु पाटील. आज डोंबिवलीमध्ये शिक्षण क्षेत्रात ज्यांच्या विद्यार्थ्यांनी उतुंग भरारी घेतली आहे. प्रसिद्ध उद्योजिका राजश्री गायकवाड सारखी विद्यार्थी याच शाळेने घडविले आहे. प्रत्येक पालकाने याच संस्थेत मुलांचे प्रवेश घ्यावे असे मी स्वाभिमानाने सांगू इच्छितो आपल्या मुलांचे …
Read More »चन्नेवाडी ग्रामस्थ श्रमदानाने बनवणार आपल्याच गावचा रस्ता
खानापूर (वार्ताहर) : चन्नेवाडी गावाला जाणाऱ्या रस्ता नादुरुस्त झाला आहे. कित्येक वर्षापासून आपल्या गावाचा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून अनेक अर्ज विनंती करून शासनाने किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधी देणे याकडे लक्ष न दिल्याने आता संतापलेल्या ग्रामस्थांनी श्रमदानाने व ग्रामस्थांतून वर्गणी काढून रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला आहे. नंदगड-नागरगाळी रस्त्याच्या चन्नेवाडी क्रॉस पासून …
Read More »सिक्कीममध्ये हिमस्खलनाची घटना, 7 जणांचा मृत्यू
22 पर्यटकांची सुखरुप सुटका सिक्कीममधील नथू ला सीमावर्ती भागात मंगळवारी (4 एप्रिल) भयंकर हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. भारतीय लष्कराने आणि मदत-बचाव पथकाने 22 जणांची सुटका केली आहे. या हिमस्खलनात जवळपास 80 पर्यटक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात …
Read More »रमाकांत कोंडुसकरांना युवा कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा
बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने रमाकांत कोंडुसकर यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या काही बैठकीमध्ये उमेदवार निवड प्रक्रिया जाहीर केली असून अधिकाधिक जनमत असलेल्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर करण्याची घोषणा केली होती. रमाकांत कोंडुसकर यांच्याकडे …
Read More »विधानसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांनी घेतला आढावा
मुंबई : कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांबरोबरच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हालचालींवर आपली बारीक नजर आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आपल्या संपर्कात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल, याचा मला विश्वास आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात समितीचा एकच उमेदवार जाहीर केल्यास, विजय निश्चित आहे, …
Read More »खानापूरातून “उद्धव बाळासाहेब ठाकरे” पक्ष निवडणूक लढवणार : राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील यांची माहिती
खानापूर : कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत यंदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष के. पी. पाटील यांनी मंगळवारी खानापुरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, कर्नाटकात शिवसेनेला मानणारा सैनिक मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून कर्नाटकात अनेक ठिकाणी कार्यकर्ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta