ओबीसी रहाणार वंचित? निवडणुका लांबणीवर शक्य बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीत केवळ अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीलाच (एसटी) आरक्षण मिळणार असल्याचे सांगून यावेळी इतर मागसवर्गीयांना (ओबीसी) आरक्षण मिळणार नसल्याची माहिती ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी प्रसार माध्यमाना दिली …
Read More »हर-हर महादेवाच्या गजरात रथोत्सव
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात आज श्री शंकराचार्य संस्थान मठाची श्री शंकरलिंग रथोत्सव महायात्रा मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात भक्तीमय वातावरणात पार पडली. आज दुपारी ३:४५ वाजता रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. रथ श्री नारायण बनशंकरी मंदिराकडून मिरवणुकीने स्वस्थानी श्री शंकराचार्य संस्थान मठाकडे लाकडी थरप लावून हर-हर महादेवाच्या …
Read More »ज्ञानदेव पवार यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला
माणगांव (नरेश पाटील) : ज्ञानदेव पवार यांनी गुरुवार दि. 10 रोजी नगराध्यक्ष पदावर विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या दिवशी माणगांव नगरपंचायतीत जाऊन आपला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे स्वागत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी केले. त्यावेळी सर्व कार्यालयीन कर्मचारी तसेच सफाई कामगार उपस्थित होते. नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आणि उपनगराध्यक्ष सचिन बोंबले यांना पुष्पगुच्छ …
Read More »कै. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांची 219 वी जयंती साजरी
बेळगाव : दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्था व सुवर्ण लक्ष्मी को ऑप क्रेडिट सोसायटी ली. यांच्या संयुक्त विद्यमानाने सोसायटीच्या सभागृहात कै. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांची 219 वी जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर तसेच प्रमुख पाहुणे प्रदीप अर्कसाली, संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर, व्हाईस चेअरमन …
Read More »खानापूरात बागायत खात्याच्यावतीने शेतकरीवर्गासाठी मार्गदर्शन शिबीर
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात बागायत खात्याच्यावतीने शेतकरीवर्गासाठी मार्गदर्शन शिबीर नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य शिवापा चलवादी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण तालुका अधिकारी रामकृष्ण मुर्ती होते. त्याचबरोबर बागायत खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बागायत खात्याच्यावतीने ड्रीप इरिगेशन बदल मार्गदर्शन, मुसरूम उत्पादन, पाम …
Read More »बेळगांवचे तीन सुपुत्र बनले ऑनररी कॅप्टन
बेळगाव : भारतीय सैन्यदलात बेळगांवच्या अनेक जवानांनी नावलौकिक मिळविला आहे.यातच आता तब्बल 28 वर्षानंतर प्रथम मराठा लाइट इन्फेंट्री रेजीमेंट सेंटर प्रथम बटालियन (जंगी पलटन) चे सूभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट राम धामणेकर हुचेंनट्टी, सूभेदार ऑनररी लेफ्टनंट बाजीराव शिंदे गणेशपूर, सूभेदार ऑनररी लेफ्टनंट अशोक सदाशिवराव जाधव खडक गल्ली या बेळगांवच्या तीन सुपुत्रांना …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बस तक्रारीची परिवहन महामंडळाकडून दखल
बेळगाव : दिनांक ०८/०२/२०२२ रोजी मच्छे येथे परिवहन मंडळाच्या बसला विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत होते. या संदर्भात म. ए. युवा समितीने हुबळीच्या परिवहन महामंडळकडे ट्विटरद्वारे तक्रार करून अतिरिक्त बसेस सोडण्याची मागणी केली होती आणि कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक …
Read More »गोवा आता ‘गोल्डन गोवा‘ बनण्याच्या मार्गावर विविध योजनांच्या माध्यमातून गोवा आता गोल्डन गोवा बनण्याच्या मार्गावर आहे. भारतमाला प्रोजेक्टच्या माध्यमातून गोव्याचा खऱ्या अर्थाने कायपालट करणार असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटले. गोवा-आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोव्याचा देखील समावेश आहे. याच पाश्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. …
Read More »गरजू मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : माहेश्वरी युवा संघ बेळगांव व ‘ऑपरेशन मदत’ यांनी संयुक्तपणे मोहीम राबवुन खानापूर तालुक्यातील कणकुंबी परिसरातील दुर्गम चिगुळे गावातील सरकारी प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यांनींना शैक्षणिक साहित्य आणि मोठ्या रगचे (ब्लॅंकेट) वाटप केले. ‘ऑपरेशन मदत’ तर्फे खानापूर तालुक्यातील जंगलातील दुर्गम खेड्यापाड्यावरील मुलांमुलींना शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार …
Read More »बेळगाव मधील 24 वर्षीय तरुण बेपत्ता
बेळगाव : हनुमान नगर हिंदवाडी येथील प्रज्वल बसवराज महांतशेट्टी (वय 24) हा युवक काल पासून बेपत्ता आहे. घरातून वॉकिंगसाठी जाणार असल्याचे या युवकाने सांगितले होते. परंतु अद्याप सदर युवक घरी परतला नसल्याने त्याच्या पालकांनी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. प्रज्वल हा विनया महाविद्यालयात डी फार्मसी शिकत आहे. प्रज्वल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta