Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

हरेकृष्ण रथयात्रा मंडपाची मुहूर्तमेढ संपन्न

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर निताय हरेकृष्ण रथयात्रा यावर्षी दि. 17 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. या रथयात्रेच्या निमित्ताने इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरासमोर मंडप उभारण्यात येणार असून त्या मंडपाची मुहूर्तमेढ रविवारी सकाळी इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या …

Read More »

शरद पवार यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा बेळगावात सर्वपक्षीयांकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याचा ठराव झाला. शरद पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला करण्यात आला होता. याचा निषेध …

Read More »

मांगुर फाट्याजवळ आयशर ट्रक पलटी

सौंदलगा : सौंदलगा येथील राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या मांगुर फाट्याजवळ आयशर ट्रक शेतात पलटी होऊन पडल्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी कोणतीही जिवितहानी झाली नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रात्री ८ च्या सुमारास गुजरात वरून बेळगावकडे निघालेला आयशर ट्रक एमएच.१० सीआर ८७४८ हा ट्रक रोहित बागडे (रा.इचलकरंजी) …

Read More »

सौंदलगा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

सौंदलगा : सौंदलगा येथे शुक्रवारी रात्री ७ च्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने सौंदलगा गावातील अनेक घरांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी घरांचे पत्रे, जनावरांच्या साठी बांधलेली शेड, घराची कवले उडून गेली आहेत तर कुंभार गल्लीमधील दुसरा मजला बांधकामासाठी उभी करण्यात आलेली मोठी भिंत शेजारच्या घरावर कोसळून लाखो …

Read More »

शेतकऱ्याने संघटितपणे जागृत राहण्याची गरज

राजू पोवार : हादनाळ येथे रयतच्या शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. शिवाय खते, बी बियाणे, औषधानीही महागाईचा कळस गाठला आहे. पण शेतकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेल्या लोकांना मात्र हमीभाव मिळत नसल्याने तो दिवसेंदिवस अडचणीत सापडत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावरील होणाऱ्या …

Read More »

गृहमंत्री संघाचे एजंट, त्यांनी राजीनामा द्यावा : आ. अंजली निंबाळकरांची मागणी

बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याप्रमाणे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र हे बेजबाबदार विधाने करून जातीय सलोखा बिघडवत आहेत. त्यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली. बेळगावातील काँग्रेस भवनात शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना आ. निंबाळकर म्हणाल्या, बंगळुरात चंद्रू याच्या हत्येप्रकरणी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी …

Read More »

आंबेवाडी गावातील रस्त्याची दुरावस्था

बेळगाव : आंबेवाडी येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावर मातीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता अधूनमधून कोसळणार्‍या पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकी घसरण्याच्या घटनेत वाढ होत आहे. येथील रस्त्याचा विकास करण्याकरिता रस्ते खोदाई करण्यात आली. मात्र काम पूर्ण करण्याकडे ग्रामपंचायतीने …

Read More »

गांजा विक्री प्रकरणी दोघाना अटक

बेळगाव : गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी खंजर गल्ली येथील युनिस अब्दुल कादर वय 23 आणि पंजीबाबा कॉलनीतील सुलतान अहमद हमीद शहा यांना अटक करून त्यांच्या जवळून 500 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. खंजर गल्लीतील पार्किंग जवळ गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मार्केट …

Read More »

शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी ‘विश्वासघात’ सप्ताह

बेळगाव : बेळगाव येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनांनी आता शेतकरी विश्वासघात सप्ताहाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने एका सप्ताहामध्ये विविध ठिकाणी निदर्शने आणि आंदोलन करून सरकारला आपल्या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात येणार आहे. 19 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने बनवलेले तीन कृषी कायदे मागे घेतले होते आणि एम …

Read More »

आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाचे बेळगावात आयोजन

बेळगाव : बेळगाव शहराला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे संगीत कला साहित्य व मनोरंजनाच्या क्षेत्रात बेळगावच्या कलाकारांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या युवा पिढीला देखील आपल्या समृद्ध वारशाचे भान आहे. बेळगावकरांना कलेची उत्तम जाण आहे आणि यातूनच प्रोत्साहन मिळते. सर्व वयाच्या लोकांना एकत्र मिळून बेळगावचा हा सांस्कृतिक …

Read More »