Wednesday , August 26 2026
Breaking News

सीमाभागात कन्नड सक्तीसाठी कन्नड संघटनांकडून प्रादेशिक आयुक्तांवर दबाव

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागातील कानडी संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊन सीमाभागात भाषिक सक्ती करण्यासाठी आणि स्थानिकांच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी दबाव टाकला.

मंगळवारी सकाळी काही कार्यकर्त्यांनी प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांच्या दालनात धाव घेतली. केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या तथाकथित कार्यकर्त्यांनी प्रशासनावर ‘कन्नड सक्ती’साठी दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत सीमाभागातील शाळा, नामफलक आणि प्रशासकीय कामकाजात केवळ कन्नड भाषेलाच सक्तीचे करण्याबाबत या मंडळींनी आक्रमक भूमिका घेतली. स्थानिक नागरिकांच्या भाषिक सोयीकडे आणि घटनादत्त अधिकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, भाषेच्या नावाखाली सीमाभागातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न या संघटनांकडून केला जात आहे. कन्नड कार्यकर्त्यांच्या या तक्रारींवर प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांनी केवळ नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रशासनाने अशा भाषिक सक्तीच्या आणि फुटीरतावादी दबावाला बळी न पडता तटस्थ राहावे, अशी भावना सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *