Saturday , June 6 2026
Breaking News

वर्सोवा-वांद्रे सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव, मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

Spread the love

 

मुंबई : वांद्रे वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव द्या अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. १३ मार्च २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातलं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं होतं. त्यात वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात यावं आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात यावं अशा दोन मागण्या केल्या होत्या. या दोन्ही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत काय काय निर्णय घेण्यात आले?
वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
एमटीएचएल ला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू असे नाव

राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटींचा निधी मंजूर

भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित.२ कोटी कार्ड्स वाटणार आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेची रक्कम १ हजार रूपयांवरून १५०० रुपये

आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ.करोडो कामगारांना लाभ मिळणार

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग)

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.

पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार

मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भूखंड

भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण

मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र उभारणार

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार

बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित

जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता

राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता

बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय

दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार

दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ

देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता

चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट

सर जे जे कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ

गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता

ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

पाकिस्तानने पकडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार

पर्यटन उपविभागासाठी उप सचिव नेमण्यात येणार

देवेंद्र फडणवीस यांनी काय मागण्या केल्या होत्या?

१३ मार्चला देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं होतं. या पत्रात कोस्टल रोड, सी लिंक आणि ट्रान्सहार्बर लिंकला नवीन नावं दिली जावीत अशी मागणी करण्यात आली होती. त्यापैकी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येईल हे आधीच जाहीर करण्यात आलं आहे. वांद्रे वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव दिलं जावं तर मुंबईतल्या ट्रान्सहार्बर लिंकला अटलबिहारी वाजपेयींचं नाव दिलं जावं अशा दोन मागण्याही पत्रात करण्यात आल्या होत्या. त्या दोन्ही मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये एसआयटी समोर नोंदवला जबाब

Spread the love  नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *