मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची बैठक संपन्न बेळगाव : येत्या २७ मे २०२३ रोजी होणाऱ्या श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची व्यापक बैठक रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता साईगणेश सोसायटी सभागृह बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे संपन्न …
Read More »भाजपच्या काळात अर्धवट पडलेल्या इंदिरा कॅन्टीनला अच्छे दिन येतील?
खानापूर (सुहास पाटील) : कर्नाटक राज्यात सिध्दरामय्या मुख्यमंत्री असताना इंदिरा कॅन्टीनला सुरूवात झाली होती. त्यामुळे सामान्य जनतेला नाष्टा, जेवन अल्पदरात मिळत होते. काही काळात सिध्दरामय्याचे सरकार कोसळले तसे इंदिरा कॅन्टीनचा प्रकल्प रखडला. त्यामुळे खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात इंदिरा कॅन्टीनचा पाया घालण्यात आलेला प्रकल्प रखडला. तो आतापर्यंत तसाच आहे. …
Read More »‘नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नाही तर राष्ट्रपतींनी करावं’, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी
नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करण्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करणे चुकीचे असल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. तसेच या ‘नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला हवं, पंतप्रधानांनी नाही’ असं देखील राहुल गांधी म्हणाले …
Read More »काँग्रेस आणि आपमधील तणाव नितीशकुमार करणार दूर? केजरीवालांची घेतली भेट
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली असून, त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त जदचे नेते नितीश कुमार यांनी आज (दि.२१) आप नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दरम्यान, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात फारसे सख्य नाही. या पार्श्वभूमीवर दोन …
Read More »फुटबॉल सामन्यादरम्यान भीषण चेंगराचेंगरी, 9 जणांचा जागीच मृत्यू
मध्य अमेरिकन देश एल साल्वाडोरमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. एल साल्वाडोरच्या राष्ट्रीय नागरी पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, या गडबडीत काहीजण खाली पडले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला. …
Read More »शिरगावच्या सख्ख्या बहिणी झाल्या पोलिस; शेतकरी बापाचे स्वप्न केले साकार
विशाळगड : सुभाष पाटील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव गावातील प्राजक्ता देवानंद न्यारे व प्रतीक्षा देवानंद न्यारे या सख्ख्या बहिनींनी पोलीस भरतीत बाजी मारली. तसेच त्याच गावातील प्रकाश जगनाथ खोंगे या युवकानेही पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्याने तिघांचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजात मुलापेक्षा मुलगी बरी, असे म्हटले जात असले, तरी …
Read More »शिवजयंती चित्ररथ मिरवणूकीत डीजे लावू नये; मंडळांना एसीपींनी केल्या सूचना
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत साऊंड सिस्टीमला थारा देऊ नये, चित्ररथासह मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा सूचना खडेबाजार विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अरुणकुमार कोळ्ळूर (ACP) यांनी केल्या. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी, विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांची खडेबाजार पोलिस ठाण्यात बैठक झाली. त्यावेळी कोळ्ळूर बोलत …
Read More »लोकसभेच्या जागा वाटपावरून युतीत नाराजीनाट्य; मित्र पक्षाचा भाजपला थेट इशारा
मुंबई : सर्वच पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या युती आणि आघाडीमध्ये घटक पक्षांच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्ह असतानाच आता मित्र पक्षाकडून भाजपला देखील इशारा देण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये भाजपचा मित्र पक्ष …
Read More »पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ‘फाइव्ह गॅरंटी’बाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काढले आदेश!
बेंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसला दणक्यात यश मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी मोठं विधान केलं होतं. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जनतेला दिलेली पाच आश्वासने पूर्ण केली जातील, असं आश्वासन राहुल गांधी यांनी केलं होतं. आज कर्नाटकात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर, लागलीच विधानसभा मंत्रिमंडळ बैठकही पार पडली. या …
Read More »खानापूरात २५ मे रोजी चित्ररथ मिरवणूक!
खानापूर : शिवजयंती निमित्त चित्ररथ मिरवणूक दि. 25 मे रोजी खानापुरात काढण्यात येणार असल्याची माहिती खानापूर शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले यांनी लक्ष्मी मंदिर खानापूर येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली दिली. यावर्षी शिवजयंती दिवशी निवडणूक आचार संहिता असल्याने शिवजयंती एक महिना पुढे ढकलण्यात आली होती. आता निवडणुका झाल्याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta