Wednesday , April 22 2026
Breaking News

भाजपच्या काळात अर्धवट पडलेल्या इंदिरा कॅन्टीनला अच्छे दिन येतील?

Spread the love

 

खानापूर (सुहास पाटील) : कर्नाटक राज्यात सिध्दरामय्या मुख्यमंत्री असताना इंदिरा कॅन्टीनला सुरूवात झाली होती. त्यामुळे सामान्य जनतेला नाष्टा, जेवन अल्पदरात मिळत होते. काही काळात सिध्दरामय्याचे सरकार कोसळले तसे इंदिरा कॅन्टीनचा प्रकल्प रखडला. त्यामुळे खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात इंदिरा कॅन्टीनचा पाया घालण्यात आलेला प्रकल्प रखडला. तो आतापर्यंत तसाच आहे.
पुन्हा कर्नाटक राज्यात सिध्दरामय्या सरकार आले. सिध्दरामय्या पुन्हा मुख्यमंत्री झाले. तसे खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारातील इंदिरा कॅन्टीनचा प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची अशा खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेतून पल्लवीत होत आहे.
गेल्या भाजप सरकारच्या काळात इंदिरा कॅन्टीनना अवकळा आली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना काही काळात अल्पदरात नाष्टा, जेवन मिळत होते. ते बंद झाले.
आता पुन्हा सिध्दरामय्या सरकार आल्याने राज्यात इंदिरा कॅन्टीनचा प्रकल्प सुरू झाला तर खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारातील इंदिरा कॅन्टीन सुरू होणार.
याचा लाभ खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेला अल्पदरातील नाष्टा व जेवन मिळेल.
खानापूरातील इंदिरा कॅन्टीनचा केवळ पाया तेवढाच उभारला आहे. आता सिध्दरामय्या सरकार इंदिरा कॅन्टीनचा प्रकल्प सुरू करून खानापूर तालुक्यातील जनतेला या योजनेचा लाभ मिळून देईल? अशी चर्चा खानापूर तालुक्यातील जनतेतून होताना दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *