बेळगाव : शिवबसव नगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात खिडकीचा दरवाजा तोडून अज्ञात व्यक्तीने चोरीचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान खिडकीचा लोखंडी दरवाजा, गंगाळ आणि इन्व्हर्टर मात्र लांबविण्यात आले आहे. याप्रकरणी मंदिर कमिटीचे अध्यक्ष ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मंगळवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी …
Read More »बडेकोळमठ येथील नागेंद्र महास्वामी यांची महाशिवरात्री निमित्त 17 फेब्रुवारी पासून यात्रा
बेळगाव : बडेकोळमठ येथील नागेंद्र महास्वामी यांची महाशिवरात्री निमित्त 17 फेब्रुवारी पासून यात्रा आयोजित करण्यात आली आहे. पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतील. शुक्रवारी 17 रोजी सायंकाळी 4 वा. कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. शिवयोगी नागेंद्र स्वामींच्या संतिबस्तवाड येथील बसवेश्वर मंदिरापासून येणारा ध्वज, शिंदोळी येथील रामलिंगेश्वर मंदिरापासून बसवेश्वर गुरुसेवा भजनी …
Read More »तेरेगाळीत सातेरी माऊली मंदिराचा कळसारोहण व लोकार्पण सोहळा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील तेरेगाळी गावची ग्राम देवता सातेरी माऊली मंदिराचे जीर्णोद्धार होऊन नवीन उभारण्यात आलेल्या मंदिराचा कळसारोहण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी मंदिराचा कळसारोहण डोंगरगाव मठाचे भयंकर महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नेरसा माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई, रामाप्पा मस्ती, …
Read More »खानापूरात शिवजयंतीनिमित्त १९ रोजी इरफान तालिकोटी ग्रुपच्या वतीने डान्स, गायन स्पर्धा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर काँग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यांच्या वतीने खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन रविवारी दि. १९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील सर्वोदय इंग्रजी हायस्कूलच्या पटांगणावर ग्रुप डान्स व गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील युवा पिढीला तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा विद्यार्थी वर्गासाठी …
Read More »खानापूरात भारत स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांची पदयात्रा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भारत स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय पदयात्रेला मंगळवारी दि. १४ रोजी जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणावरून प्रारंभ झाला. प्रारंभी बीईओ राजेश्वरी कुडची, क्षेत्र समन्वय अधिकारी ए आर आंबगी, पी ई ओ श्रीमती मिरजी तसेच डाॅ डी ई नाडगौडा आदी हिरवा निशाना दाखवुन पदयात्रेला चालना दिली. …
Read More »बेळगाव शहराच्या विविध ठिकाणी दि. 17 व 18 रोजी पाणी पुरवठ्यात व्यत्यय
बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणार्या हिडकल जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. गळतीच्या दुरुस्तीचे काम बुधवार दि. 16 पासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवार दि. 17 व 18 रोजी शहरांच्या विविध भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दक्षिण विभागातील मजगाव, नानावाडी, चिंदबरनगर, शहापूर, वडगाव आणि जुनेबेळगाव तर उत्तर विभागातील …
Read More »शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेत टिळकवाडी विभाग अ संघाला विजेतेपद
बेळगाव : टिळकवाडी येथील व्हॅस्कीन डेपो मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने बेळगाव शहर माध्यमिक आंतर विभाग शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत टिळकवाडी अ संघाने गोमटेश टिळकवाडी ब संघाचा अटीतटीच्या लढतीत अवघ्या 3 धावांनी पराभव करीत हनुमान चषक पटकाविला. अंतिम सामन्यातील सामनावीर देवेंद्र …
Read More »श्रीमरगाई महिला मंडळाचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात
बेळगाव : रामनगर वडरवाडी येथे श्रीमरगाई महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मीनाताई बेनके उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी येथील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांना आपण समाजात कशाप्रकारे पुढे आले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी हळदीकुंकूचे महत्त्व यावेळी महिलांना …
Read More »नियती फाऊंडेशनच्या माध्यमातून मिशन “नो सुसाईड” उपक्रम!
खानापूर : अलीकडे खानापूर तालुक्यात व बेळगावात युवकांनी आत्महत्या केल्या. त्यावर एक आत्मचिंतन व उपाययोजनेची गरज आहे. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नियती फाऊंडेशनच्या माध्यमातून मिशन “नो सुसाईड” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. येत्या काही दिवसात खानापूर तालुक्यात समुपदेशन करण्यात येणार आहे, असे डॉ. सोनाली सरनोबत यांनी सांगितले. आत्महत्या …
Read More »शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित मोहिमेचा भंडारा
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव यांच्यावतीने दरवर्षी प्रत्येक गावोगावी होणारा मोहिमेचा भंडारा प्रथमच एकत्रितपणे आयोजिण्यात आला आहे. गुरुवर्य संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण व शहर विभागाचा संयुक्त मोहीम भंडारा बुधवार दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता कपिलेश्वर मंदिरा शेजारी असलेल्या गणपती विसर्जन तलाव परिसरात आयोजित करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta