Wednesday , June 17 2026
Breaking News

यळेबैल येथे जकनुबाई मंदिर परिसरात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे धोका; तात्काळ दुरुस्तीची मागणी

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : यळेबैल गावातील जकनुबाई मंदिर परिसरातील खुल्या पटांगणात विद्युत तारा खाली लोंबकळत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पटांगणात लहान मुले नियमितपणे खेळत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांनी तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.

जकनुबाई मंदिराच्या परिसरात असलेले हे पटांगण गावातील मुलांसाठी खेळण्याचे मुख्य ठिकाण आहे. दररोज संध्याकाळच्या वेळी येथे अनेक मुले खेळण्यासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी विद्युत तारा अत्यंत खाली लोंबकळत असल्यामुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. पावसाळा किंवा वाऱ्याच्या वेळी या तारांचा अधिक धोका वाढण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याबाबत गावातील नागरिकांनी विद्युत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना समज दिली असून लोंबकळत असलेल्या तारांची तात्काळ दुरुस्ती करून त्या सुरक्षित उंचीवर बसवाव्यात आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने लवकरात लवकर प्रत्येक्षात पाहणी करून समस्या दूर करावी, अशीही ग्रामस्थांची मागणी आहे.

दरम्यान, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना केल्यास गावातील मुलांचे संभाव्य धोके टाळता येतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांच्या फेस रिडिंग हजेरी प्रणालीचा पहिलाच दिवस गोंधळात; तांत्रिक अडचणींमुळे उपस्थिती नोंदविण्यात अडथळे

Spread the love  बेळगाव : सरकारी शाळांमधील उपस्थिती व्यवस्थापन अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *