Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

आमदार हसन मुश्रीफांच्या तीन मुलांची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव

  मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे. दाखल केलेल्या अर्जावर 16 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. राजकीय हेतूने अटक होण्याची शक्यता असल्याचा अटकपूर्व जामीन अर्जात उल्लेख करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने मुश्रीफांवर कथित …

Read More »

चर्मकार समाज मोफत वधूवर सूचक मेळावा ५ मार्चला बेळगावात

  बेळगाव : कर्नाटक राज्य हरळ्ळया (चर्मकार) समाजवतीने रविवार दिनांक 5 मार्च रोजी राज्य स्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात प्रोत्साह फाउंडेशनच्या पुढाकाराने चर्मकार समाज मोफत वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोत्साह फाउंडेशनच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत 5 मार्च रोजी येथील कुमार गंधर्व रंगमंदिरात मोफत वधू …

Read More »

खासदार संजय राऊत यांना बेळगावात अटकपूर्व जामीन मंजूर

  बेळगाव : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणूकीच्या काळात बेळगाव येथे येऊन वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात तारखांना हजर न राहिल्यामुळे त्यांच्यावर वॉरंट बजावण्यात आला होता. दरम्यान बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी खासदार संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला …

Read More »

बेळगावात रंगणार पहिले बालनाट्य संमेलन!

  बेळगाव : बेळगावमध्ये १८ व १९ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ आयोजित पहिले बालनाट्य संमेलन रंगणार आहे. ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ ने एक डौलदार पाऊल पुढे टाकत बेळगावमध्ये या साहित्य संमेलनाचे आयोजन केले असून सदर संमेलन बेळगाव येथील ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये आयोजिण्यात आले आहे. हे संमेलन सुमारे तीनशे मुलांसाठी …

Read More »

खानापूरात मुलींची थ्रो बॉल स्पर्धा; गव्हर्मेंट हायस्कूल खानापूरने पटकावला पहिला क्रमांक

  खानापूर : खानापूर येथे डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नियती फाउंडेशनच्या वतीने खानापूर येथे कित्तुर राणी चनम्मा ट्रॉफी मुलींच्या थ्रो बॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यासाठी मुलींचा व त्यांच्या पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सामन्यामध्ये 16 मुलींचे संघ सहभागी झाले होते. नियती फाउंडेशनतर्फे विजेत्या संघाला 70001 रुपये, 5000 …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले कोळेकर कुटुंबीयाचे सांत्वन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कौंदल गावातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर येताच भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. महादेव सुभाष कोळेकर (17) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लष्करात भरती न झाल्याने त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. डॉ. सोनाली सरनोबत यावेळी बोलताना …

Read More »

खानापूर विधानसभा मतदारसंघातून मुरलीधर पाटील यांचा समितीकडे अर्ज सादर

  खानापूर : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून इच्छुकांचे अर्ज सादर करण्यासाठी आवाहन केले आहे. यानुसार आज खानापूर विधानसभा मतदारसंघातून खानापूर मध्यवर्ती विकास बँकेचे मुरलीधर पाटील यांनी उमेदवारीसाठी अर्ज समितीकडे सादर केला आहे. अर्जदारांकडून ५१ हजार रुपये देणगीदाखल घेऊन म. ए. समिती अर्ज स्वीकारत …

Read More »

खानापूर म. ए. समितीची जांबोटीत जनजागृती फेरी

  बहुसंख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवाहन खानापूर : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाचा लढा आता सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असून आपण सर्वांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन आगामी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी व मराठी भाषिकावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीकडे …

Read More »

ट्रॅक्टरच्या चाकात सापडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    अथणी : अथणी तालुक्यातील तेवरट्टी गावात आज ट्रॅक्टरच्या चाकात सापडून सात वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. सुदर्शन निलजगी (७) असे मयत बालकाचे नाव आहे. आज सकाळी मुलगा मामासोबत ट्रॅक्टरने शाळेसाठी निघाला होता. शाळा आल्यानंतर तो शाळेत जाण्यासाठी खाली उतरत ट्रॅक्टरची धडक बसून मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना …

Read More »

रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास उपोषण; संतप्त नागरिकांचा इशारा

उत्तम पाटील युवाशक्तीतर्फे तात्पुरती डागडुजी निपाणी (वार्ता) : बोरगाव ते इचलकरंजी, कुरुंदवाड, बेडकिहाळ, हुपरी तथा अन्य मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर  खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे अडचणीचे ठरले आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी  अन्यथा उपोषण करण्याचा इशारा नगरसेकांसह नागरिकांनी दिला आहे. बोरगाव येथे उत्तम पाटील …

Read More »