Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या बगॅसला आग; १.५ कोटीचे नुकसान

अग्निशामक दलाच्या ७ वाहनाद्वारे आग आटोक्यात निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला गुरुवारी (ता.१९) सकाळी साडेदहा वाजता सुमारास अचानक आग लागली. निपाणी, चिकोडी संकेश्वर, बिद्रीसह अग्निशामक दलाच्या सात वाहनाद्वारे तासाभरात ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये साखर कारखान्याचे १.५ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत अग्निशामक दलाकडून …

Read More »

कोल्हापूर, सांगलीवर अलमट्टी धरणाच्या उंचीची टांगती तलवार! राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

  मुंबई : कोल्हापूर आणि सांगली येथील पुरावर अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटर परिणामाचा सिम्युलेशन आणि हायड्रोडायनॅमिक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार उत्तराखंडमधील रुरकी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी (NIH) च्या तज्ज्ञांची मदत घेणार आहे. राज्य सरकार आणि NIH संस्थेमध्ये प्राथमिक चर्चा यापूर्वी झाली आहे. या चर्चेनंतर संस्थेचे संचालक सुधीर कुमार यांना औपचारिक …

Read More »

शारदा हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात प्रारंभ!

बेळगाव : हालगा येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित शारदा हायस्कूलमध्ये 39 व्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला. संस्थेचे चेअरमन श्री. विजय अर्जुन लोहार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. वडगाव येथील मंगाई सौहार्द सोसायटी नियमितचे चेअरमन श्री. सतीश शिवाजी पाटील प्रमुख …

Read More »

बेळगावात 21 ते 24 जानेवारीदरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव!

  बेळगाव : 21 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान बेळगावकरांना आंतराष्ट्रीय पतंग महोत्सवाची अनुभूती घेता येणार आहे. रंगीबेरंगी व आकर्षक पतंगांनी आकाश सजणार आहे. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या वतीने बेळगाव शहरातील मालिनी सिटी मैदानावर 11 व्या भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावातील एका खाजगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार …

Read More »

महिलाच सामाजिक व राजकीय बदल घडवू शकतात; डॉ. सोनाली सरनोबत

  खानापूर : महिलांनी त्यांचे हक्क व जबाबदाऱ्यांप्रति जागरूक असले पाहिजे. एक स्त्रीच चांगला समाज घडवू शकते. स्त्री ही अबला नसून ती सबला आहे. खानापूर तालुक्यात 54 टक्के महिला मतदार आहेत. समस्त महिला आपल्या हक्क व जबाबदरीप्रति जागरूक असतील तर महिला सामाजिक व राजकीय बदल घडवू शकतात, असे मत भाजपा …

Read More »

नंदगड येथे मालमत्तेच्या वादातून एकाची हत्या

  खानापूर : मालमत्तेच्या वादातून भाऊबंदांनी एकाची हत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी खानापूर तालुक्यातील नंदगड परिसरात घडली. यल्लाप्पा संताराम गुरव (वय 33 वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या बाळी कोडल गावच्या वेशीवरील एका घरात सदर खुनाचा प्रकार घडला आहे. मालमत्तेच्या वादातून …

Read More »

अथणी येथे वीज केंद्रात भीषण आग

  अथणी : येथील 110 केव्ही वीज केंद्रात भीषण आग लागली आहे. सदर आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर पसरून संपूर्ण वीज केंद्राला आगीने वेढले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अथणी शहरातील विजापूर रोडला जोडलेल्या वीज केंद्रात सकाळी 09.15 च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात …

Read More »

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यावश्यक : चित्रपट निर्माते-अभिनेते चरणराज

  बेळगाव : विद्यार्थ्यांना चांगले जीवन जगायचे असेल आणि चांगले नागरिक बनायचे असेल तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते चरणराज यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील भरतेश शिक्षण संस्थेच्या डी. वाय.चौगुले भरतेश हायस्कूलच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुलांना बालवयातच दर्जेदार शिक्षण मिळाले तर …

Read More »

बालहक्क आणि संरक्षणासंदर्भात के. नागनगौडा यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

  बेळगाव : लैंगिक हिंसा, कुपोषण, बालविवाह, बालमजुरी, भीक मागणे यासह विविध कायदेशीर संघर्षांमधील मुलांची ओळख पटवून त्यांना मुख्यप्रवाहात आणणे तसेच मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासंदर्भात कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष के. नागनगौडा यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. बुधवारी जिल्हा पंचायत सभागृहात बाल न्यायालय कायदा, आर.टी.ई., बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून …

Read More »

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, नऊ प्रवाशांचा मृत्यू

  रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जवळील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. तसेच, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी …

Read More »