Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

यमनापूर ग्रामस्थांचा हिंडाल्को विरोधात भव्य मोर्चा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील यमनापूर गावच्या ग्रामस्थांनी हिंडाल्को कंपनीच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे फलक घेऊन हिंडाल्को कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यमनापूर गावातील ग्रामस्थांची जमीन, हिंडाल्को कंपनीने आपल्या व्यवसायासाठी घेतली आहे. मात्र कंपनीकडून गावातील लोकांना कोणतीही सुविधा देण्यात येत नसल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. यमनापूर गावातील …

Read More »

सेनेगलमध्ये दोन बसेसची धडक, 40 जणांचा मृत्यू

  तीन दिवसांचा दुखवटा जाहीर सेनेगल : सेनेगल देशात दोन बसेस यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे तब्बल 40 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर येथे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हा अपघात सेंट्रल सेनेगलच्या …

Read More »

पुण्यात बेळगावकर एकता ग्रुपची स्थापना

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-बेळगाव या मूळ परिसरातील पण सध्या रायकर माळा, धायरीगाव पुणे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक हेतूने “बेळगावकर एकता ग्रुप” या संघटनेची स्थापना केली. या ठिकाणी खानापूर-बेळगाव व तत्सम परिसरातील साधारण ५० कुटुंब आहेत. अनेक विधायक कार्यासाठी आणि सणोत्सव साजरे करण्यासाठी ही मंडळी एकत्र येत …

Read More »

शिवसेनेत दोन गट पाडणे, हे भाजपचेच मिशन; गिरीश महाजनांनी दिली कबुली

  मुंबई : शिवसेनेत बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणालाही कलाटणी मिळाली. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर दोन गट तयार झाले. एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट एकनाथ शिंदे यांच्यासह 40 ते 50 आमदार यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. भाजप आणि …

Read More »

सीमाभागातील साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांना साहित्य गौरव पुरस्कार प्रदान

  “बेळगाव कुणाच्या बापाच.., माझा बाप उद्धवस्त गिरणी कामगार.., जागर वेश्याचा…, बागलकोटची सुगंधा…, प्रेयसी एक आठवण…, लेक जगवा लेक शिकवा आणि व्यसनमुक्ती….” या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक श्री. अर्जुन विष्णू जाधव यांना शुक्रवार दि. ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मानाचा “साहित्य गौरव पुरस्कार..” हा देऊन सन्मानित ठाणे येथे करण्यात आले आहे. ठाणे …

Read More »

सडा किल्ल्यावर स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दुर्गसंवर्धन व स्वच्छता अभियान

  बेळगाव : छत्रपती शंभूराजे परिवार महाराष्ट्र व ‘ऑपरेशन मदत’ यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कणकुंबी परिसरातील अतिदुर्गम भागात वसलेल्या सडा किल्ल्यावर स्वच्छ भारत अभियानांअंतर्गत दुर्गसंवर्धन व स्वच्छता अभियान राबविले. या कार्यक्रमाला कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातून स्वयंसेवक आले होते. महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, सिंधुदुर्ग येथून …

Read More »

बेळगाव ग्रामीणमध्ये नारळ आणि शपथ!

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागात लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून निवडणूक प्रचार होत आहे. लिंबू-नारळ इत्यादी वस्तूवर लोकांचा हात ठेवून शपथ घेऊन आतापासूनच मतांची याचना करीत काही राष्ट्रीय पक्षांची लोकं फिरत आहेत. प्रशासनाने याच्यावर कार्यवाही करून संबंधितांवर कडक शासन करावे. अन्यथा लोकांनी संतप्त होऊन चुकीचे पाऊल …

Read More »

रवी कोकीतकर हल्ला प्रकरणी तीन आरोपींना अटक

  बेळगाव : बेळगावचे श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर गोळ्या झाडून फरार झालेल्या तीन आरोपींना पोलिसांनी चोवीस तासांत मोठ्या कारवाईत अटक केली. बेळगावच्या शहापूर भागातील अभिजीत सोमनाथ भातकांडे वय 41 रा. पाटील मळा बेळगाव यांच्यासह राहुल निंगाणी कोडचवड वय 32 रा. संभाजी गल्ली बस्तवाड, जोतिबा गंगाराम मूतगेकर वय 32 …

Read More »

हेल्प फॉर निडीने घेतली शरद पवार आणि अजित पवार यांची भेट

  बेळगाव : हेल्प फॉर निडी या बेळगावच्या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची तसेच आज शिनोळी येथे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांची ही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कोल्हापूर मध्ये झालेल्या या भेटीत 2017 पासून हेल्प फॉर निडी …

Read More »

कोगनोळी येथे सशस्त्र दरोडा

  अन्य चार किरकोळ चोरी : दोघे जखमी कोगनोळी : येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या घरात अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून दोघांना जबर मारहाण करून दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार तारीख आठ रोजी मध्यरात्री घडली. सशस्त्र दरोडेखोरांनी मारहाण केल्याने सी. वाय. पाटील व मुलगी ऐश्वर्या घोरपडे गंभीर जखमी …

Read More »