Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

“ऑपरेशन मदत” अभियानांतर्गत गोल्याळी येथे विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य भेट

  बेळगाव : ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गोल्याळी गावातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना ग्रामीण शिक्षण अभियानांतर्गत खेळाचे साहित्य भेट स्वरूपात दिले. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा संपल्या आहेत. तेव्हां या छोट्या मुलां-मुलींना मैदानात खेळायची संधी मिळाली म्हणून ‘ऑपरेशन मदत’ संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून या …

Read More »

आचारसंहितेचे उल्लंघन केलास कठोर कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

  बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता बुधवार पासून लागू होत असल्याने सार्वजनिक ठिकाणावरील सर्व पोस्टर्स, बॅनर, भित्तिचित्रे काढून टाकण्यात यावीत. निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या सर्व पथकांनी तातडीने कामाला लागावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणूक अधिकारी व …

Read More »

खानापूर कंत्राटदारांच्या बैठकीची काँग्रेस पक्षाला भिती, खोटे आरोप केल्याची बतावणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेने नुकताच बैठक घेऊन तालुक्यात स्थानिक उमेदवारालाच येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आणू. कारण गेल्या पाच वर्षाच्या काळात खानापूर सरकारी कंत्राटदाराना कोणतेच काम दिले नाही. त्यामुळे खानापूर सरकारी कंत्राटदारच्या सदस्यांना उपासमारीची वेळ आली. गेल्या ४० वर्षाच्या काळात अशी वेळ आली नव्हती. खानापूर सरकारी …

Read More »

“शांताई”तर्फे उद्या डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान

  बेळगाव : शांताई वृद्धाश्रम आणि आयएमईआरच्या संयुक्त विद्यमाने ‘शांताई’च्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या गुरुवार दि. 30 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुप्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मधुमेहावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉ. जगन्नाथ दीक्षित हे मधुमेह मुक्त भारत व्हावा या उद्देशाने मधुमेह कशा पद्धतीने बरा होईल? आणि …

Read More »

कुनो नॅशनल पार्कमधून आली गूड न्‍यूज : मादी चित्त्‍याने दिला चार बछड्यांना जन्म

  नवी दिल्ली : नामिबियातून १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात आणलेल्या कुनो नॅशनल पार्कमधील मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी चार बछड्यांचा व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नामिबियातून (दक्षिण आफ्रिका) १७ सप्टेंबर २०२२ …

Read More »

आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर, विराट कोहलीला मोठा फायदा!

  नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आयसीसी वनडे क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेतली आहे. तो आता सातव्या क्रमांकावर आला आहे. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या वनडेत त्याने अर्धशतक (54) फटकावले होते. या खेळीचा त्याला जबरदस्त फायदा झाला आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज अजूनही वनडे …

Read More »

अवैध हात भट्टीवर खानापूर पोलिसांची कारवाई

  खानापूर (प्रतिनिधी) : येत्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात पोलिस खात्याकडून अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे खानापूर जांबोटी रोडवरील काजूच्या बागेत हात भट्टीवर दारू काढत असल्याची माहिती मिळताच खानापूर पोलिस स्थानकाचे सी पी आय रामचंद्र नायक यांनी बैलहोंगल डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली छाप्यात टाकाला. छाप्यात …

Read More »

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

  मुंबई : भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. …

Read More »

कर्नाटक विधानसभा निवडणूक बिगुल वाजले! 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी

  नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. त्यानुसार १० मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. असा असेल निवडणूक कार्यक्रम नोटिफिकेशन – १३ …

Read More »

अपघातातील जखमी युवकाचा दुर्दैवी मृत्यू

बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष नागेंद्र (भोला) हणमंत पाखरे यांचे चिरंजीव सोमनाथ पाखरे (वय 23) याचे येळ्ळूर रोड सैनिक भवन समोर दोन दिवस आधी अपघात झाला होता. आज त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंत्यसंस्कार आज येळ्ळूर स्मशानभूमीत फुटून तलाव या ठिकाणी आज दुपारी 2.00 वा होणार आहेत. उद्या …

Read More »