Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

उत्तम पाटील नावाच्या वादळात सर्व नेतेमंडळी उडून जातील

  प्राध्यापक सुभाष जोशी : कोनोळीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी कोगनोळी : कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून केलेली विकास कामे कौतुकास्पद आहेत. 2000 साली आमदारकीच्या निवडणुकीत सोळाशे मतदान झाले होते. या ठिकाणी विरोध आहे. कोगनोळी येथे दबाव टाकून देखील इतक्या मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या हे कौतुकास्पद आहे. …

Read More »

देवलत्ती येथे डॉ. सोनाली सरनोबत यांचा सत्कार

  खानापूर : देवलत्ती (ता. खानापूर) येथील वीज समस्या निकाली लावण्यात भाजप ग्रामीण महिला उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी यश मिळवले. यानिमित्त देवलत्तीवासीयांनी त्यांचा नागरी सत्कार केला. डॉ. सरनोबत त्यांनी गावातील समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल ग्रामस्थांनी प्रशंसा केली. डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या, गावातील कोणत्याही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत आयोजित होळीला महिलांची उत्स्फूर्त दाद

    खानापूर : भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत तसेच देसी गर्ल्सतर्फे खानापूर येथे जल्लोषात होळी साजरी करण्यात आली. यावेळी हजारो युवती, महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रेन डान्स, पारंपरिक नृत्य, डीजे, अन्नोत्सव या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. डॉ. सोनाली सरनोबत यांनी उपस्थित महिला, युवतींसह नृत्याचा आनंद लुटला. …

Read More »

राजहंसगडावरील छ. शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी नियोजन कमिटीची स्थापना

  बेळगाव : दिनांक 19/03/2023 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळा व महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक रंगुबाई पॅलेस येथे संपन्न झाली व यावेळी कार्यक्रम नियोजन कमिटी ठरविण्यात आली. महाप्रसादाच्या नियोजनाची जबाबदारी येळ्ळूर- येळ्ळूर विभाग समिती व परिसरातील गावावर सोपविण्यात आली असून देणगी व साहित्य …

Read More »

शहापूर, वडगाव भागात रंगपंचमी उत्साहात

  बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला रंगोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आज पाचव्या दिवशी बेळगाव तालुक्यासह शहराच्या दक्षिण भागात रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देत महिलांनीही रंगोत्सवाचा आनंद लुटला. सकाळपासूनच गावागावांमध्ये रंग उधळण्यास प्रारंभ झाला. शहरात विशेषत: …

Read More »

चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…

  बेळगाव : सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व कमी खर्चात त्यांच्यावर औषध उपचार व्हावेत. यासाठी बेळगाव येथील विजय हॉस्पिटल व होनगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरात करण्यात आले होते. या शिबिराचे …

Read More »

खानापूर मलप्रभा क्रीडांगणाला गेल्या पाच वर्षांत निधीच नाही; विकास होणार कुठून?

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणाला माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या  प्रयत्नाने सुरूवात झाली. कोट्यावधी रूपयाचा निधी मंजूर करून मलप्रभा क्रीडांगण उभारण्यात आले. मात्र या क्रीडांगणाकडे कोणीही विकासाच्या दृष्टीने पाहिले नाही. आजी-माजी आमदारानी याकडे डोळेझाक केली. मात्र हेच लोकप्रतिनिधी मलप्रभा क्रीडागणावर मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून …

Read More »

खानापूर तालुक्यातील गवत गंजीना आग लागण्याचा प्रकार सुरूच, रविवारी चापगावात गवत गंजीला आग

  खानापूर (प्रतिनिधी) : ऐन उन्हाळ्यात आग लागण्याचे प्रकार खानापूर तालुक्यात सुरूच आहेत. कधी काजूच्या बागेला आग लागल्याची घटना घडली. तर कधी जंगलाला आग लागून नुकसान झाले आहे. अशाच प्रकारे चापगावात (ता. खानापूर) येथे रविवारी दि. १२ रोजी भर दुपारी शेतातील घराच्या बाजुला असलेल्या गवत गंजीला आग लागून दोन ट्रॅक्टर …

Read More »

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 4:00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुक आणि राजहंसगड छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीपूजेसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. शहर म. ए. समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते, युवक …

Read More »

८० वर्षे वयावरील मतदारासाठी घरीच मतदानाचा पर्याय : राजीव कुमार

  एकाच टप्प्यात निवडणुका घेण्याचे संकेत बंगळूर : कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीत ८० वर्षांवरील लोकांसाठी आणि अपंगांसाठी मतदान-घरातून (व्हीएफएच) ही सुविधा सुरू केली आहे. निवडणुक आयोग प्रथमच ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही सुविधा देणार आहे, असे निवडणूक आयोगाने शनिवारी सांगितले. राज्यातील सर्व २२४ मतदारसंघात एकाच टप्प्यात निवडणुका घेण्याचेही त्यांनी …

Read More »