Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

लाल पिवळा झेंडा प्रकरणी समितीचे सात कार्यकर्ते निर्दोष

  बेळगाव : निदर्शने आणि प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोप खाली दाखल गुन्ह्यातून म. ए. समितीच्या सात कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. येथील पाचवे कनिष्ठ न्यायालय व प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयाने हा निकाल दिला आहे. प्रादेशिक आयुक्त कार्यालयासह शहरातील विविध शासकीय कार्यालयात लाल पिवळा झेंडा लावून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आक्षेप समितीने …

Read More »

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय खासदारांसमवेत उद्या बैठक

  नवी दिल्ली : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय खासदारांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राच्या खासदारांच्या विनंतीला सहमती दर्शवत अमित शहा यांनी गुरुवारी दुपारी 12.40 वाजता चर्चेसाठी वेळ दिला आहे. बुधवारी, संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांच्यासह महाराष्ट्रातील काही खासदारांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित करत कर्नाटकवर ताशेरे …

Read More »

निपाणीतून काँग्रेसतर्फे काकासाहेब पाटीलच उमेदवार

माजी मंत्री विरकुमार पाटील : अपप्रचाराला बळी पडू नका निपाणी (वार्ता) : कोणत्याही अप्रचाराला बळी पडू नका. २०२३च्या विधानसभा निवडणूकीसाठी काकासाहेब पाटील हेच उमेदवार असणार असल्याचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी स्पष्ट केले. यरनाळ येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. वीरकुमार पाटील म्हणाले, काही लोक फक्त जाहिरातबाजी करून …

Read More »

कोल्हापूरच्या कार्निवलमध्ये गोमटेशचा डंका!

निपाणी (वार्ता) : ७५ वा स्वातंत्र्यदिन आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर यांनी ‘कार्निवल’ …. देश मेरा रंगीला या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणीला विशेष आमंत्रित करण्यात आले होते. पुणे, सातारा, सांगली …

Read More »

पुणे येथील आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या अधिवेशनात बाळकृष्ण पाटील यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार

निपाणी (वार्ता) : आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था (भारत) या संघटनेचे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन हिवाळी अधिवेशन २०२२ आकुर्डी पुणे येथे पार पडले. त्यामध्ये शिप्पूर येथील सेवानिवृत्त जवान बाळकृष्ण पाटील यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बाळकृष्ण पाटील …

Read More »

प्रसारमाध्यम क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी

  मराठा मंडळ पदवी कॉलेजमध्ये पत्रकार संजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन बेळगाव : पदवीनंतर प्रसारमाध्यम क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. पत्रकारितेत करिअर घडविण्यासाठी अस्खलित बोलणे जितके महत्वाचे तितकेच लेखन कौशल्यही महत्वाचे आहे, असे प्रतिपादन दै. पुढारीचे वृत्तसंपादक संजय सूर्यवंशी यांनी केले. येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह महाविद्यालयात तिन्ही …

Read More »

…तर आम्ही हातात दगड घेऊ! शनिवारी कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

  कोल्हापूर : सीमावादाला हिंसक वळण देणाऱ्या आणि बेताल वक्तव्ये करत सुटलेल्या कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीने कोल्हापुरात एल्गार पुकारला आहे. शनिवारी कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. शनिवारी शाहू महाराजांच्या समाधीजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. …

Read More »

बदलत्या काळानुसार कौशल्य आणि तंत्रज्ञान ही काळाची गरज : डॉ. सरनोबत

  खानापूर : खानापूर फोटोग्राफर असोसिएशच्या वतीने 6 डिसेंबर रोजी शुभम गार्डन येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष दीपक गुरव, भाजपा नेत्या सोनाली सरनोबत, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर भाजपा अध्यक्ष संजय कुबल, समाजसेवक रवी कोटगी, ज्ञानेश्वर ओलकर, अमित पवार …

Read More »

‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडास आवर घालावा आणि…’ राज ठाकरेंचा सूचक इशारा!

  मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडूनही वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. अशातच काल बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून …

Read More »

महाराष्ट्र -कर्नाटक वादाचे लोकसभेत पडसाद; सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत आक्रमक

  नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सुरू असलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला. कर्नाटक सरकारवर टीका केल्यानंतर लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत …

Read More »