Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

आरएलएस कॉलेजचे बास्केटबॉलमध्ये सुयश

  बेळगाव : शहरातील केएलई सोसायटीच्या आर. एल. सायन्स कॉलेजच्या बास्केटबॉल संघाने नुकत्याच झालेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले आहे. अथणी येथील केएलई सोसायटीच्या एसएमएस कॉलेजने यंदाच्या या आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. आर. एल. सायन्स कॉलेजच्या बास्केटबॉल संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली, …

Read More »

संपतकुमार देसाईवर करा कारवाई : दलित संघर्ष समितीची मागणी

  बेळगाव : जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या संपतकुमार देसाई यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद या संघटनेने शहरातील आंबेडकर उद्यानापासून मोर्चा आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शनिवारीदलित संघर्ष समितीच्या वतीने मल्लेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आंबेडकर पार्क येथून मोर्चा काढला. बेळगाव तालुक्यातील तुरमरी गावातील एक दलित विद्यार्थी बेळगाव …

Read More »

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी २० डिसेंबर २०२२ रोजी सुवर्ण विधान सौध समोर भव्य मोर्चा

  बेळगाव : मराठा समाजाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या मागणीसाठी कर्नाटक मराठा समाजाअंतर्गत आम्हाला 2A श्रेणी द्यावी, सध्या आम्ही 3B श्रेणीत येतो, यासाठी एक विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे महापूजा करून या रॅलीचे महत्त्व व जनजागृती सुरू केली असून आगामी काळात हे …

Read More »

जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने ८ डिसेंबर रोजी पुरुषांसाठी खुल्या मॅरेथॉन स्पर्धा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गेल्या तीस वर्षांपूर्वी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या दि. जांबोटी मल्टीपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने येत्या ८ डिसेंबर रोजी खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा तालुक्यातील स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दि. जांबोटी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक, चेअरमन विलास बेळगांवकर …

Read More »

मोदींना रावण म्हटल्याने तुमची अस्मिता जागी होते, मग शिवरायांच्या अपमानावर थंड का? शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

  मुंबई : गुजरातच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 100 तोंडी रावण म्हटल्यानंतर भाजपने गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे म्हटले. मात्र, जर मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान ठरत असेल तर छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ‘भाजप’ पाठीशी घालते, त्यांचा बचाव करते यास काय म्हणावे? …

Read More »

यापुढे शिवरायांचा अवमान करूनच दाखवावा : उदयनराजे भोसले

  रायगड : ‘कुठल्याही प्रकारचे राजकारण येऊ देऊ नका, आपलं कोणतंही स्वार्थ नाही. यापुढे शिवरायांचा अवमान करूनच दाखवावा, काय होईल त्यावेळेस आपआपल्या परीने पाहून घेऊ. अवमान करणाऱ्यांना वेळ दाखवण्याची वेळ आली आहे. मन आज व्यथित झालं आहे. दुखीत झालं आहे. आज व्यथित होऊन चालणार नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाऊन बांधणी …

Read More »

पद्मनाभ पीठ येथे मार्गशीर्ष गुरुवर दत्तगुरुवर सोहळा संपन्न

  पणजी : कुंडई गोवा येथील दत्त पद्मनाभ पीठ येथे मार्गशीर्ष गुरुवर दत्तगुरुवर सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. पद्मश्री ब्रह्मानंद स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली हा आश्रम चालतो. सदर सोहळ्यामध्ये डॉ. सोनाली सरनोबत यांनी जीवनामध्ये अध्यात्मासोबत आरोग्याचे महत्व पटवून दिले. सदर कार्यक्रम खानापूर …

Read More »

अल्पसंख्याक मतदारांना यादीतून वगळले नाही; मुख्यमंत्री बोम्मईंचे स्पष्टीकरण

  बंगळूर : अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा आरोप मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. ते हुबळी येथे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की मतदार ओळखपत्र घोटाळ्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष घातले आहे. मतदारांची नावे मतदार यादीत जोडण्याची किंवा काढून टाकण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली केली …

Read More »

सौंदलगा येथे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या गोडाऊनचे उद्घघाटन

  सौंदलगा : सहकार क्षेत्रात सौंदलगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचा दबदबा, संघाने १०४ वर्षात केलेली प्रगती व सभासदांच्यासाठी दिलेली सेवा महत्त्वाची, असे प्रतिपादन खासदार अण्णासाहेब जोल्ले, संचालक बीडीसीसी बँक बेळगाव यांनी सौंदलगा येथे प्राथमिक कृषी पत्तीन कडून बांधण्यात आलेल्या गोडाऊनचे उद्घाटन करताना आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोडाऊनचे उद्घाटन …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नारायण मयेकर यांची बिनविरोध निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांनी दिल्यामुळे गेली २५ वर्षे नगरसेवक म्हणून उच्चांक गाठलेले ज्येष्ठ नगरसेवक नारायण मयेकर यांची बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून शुक्रवारी दि. २ डिसेंबर रोजी निवड झाली. यावेळी निवडून अधिकारी तहसीलदार प्रविण जैन होते. यावेळी नगरपंचायतीच्या १९ नगरसेवकांनी नारायण मयेकर यांचा अर्ज …

Read More »