बेळगाव : दिनांक 08 फेब्रुवारी 2023 रोजी बेळगाव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे भेट दिली व आश्वासनानुसार कणबर्गी गाव ते श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे. रहिवाशांच्या मागणीनुसार देवस्थान ट्रस्ट कमिटी आणि देवस्थानच्या प्रवेशद्वारावर काँक्रीटची उभारणी, पथदिवे बसवणे, भाविकांच्या वापरासाठी …
Read More »समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्याकडून खेळाचे प्रशिक्षण
बेळगाव : समाजसेविका माधुरी जाधव-पाटील यांनी हिंदवाडी येथील आदर्श विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांसाठी कब्बडीचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी सदर खेळाचे प्रशिक्षण माधुरी जाधव-पाटील यांनी देत आहेत. मुलांनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ राहावे, तसेच क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवावे, या दृष्टिकोनातून त्यांनी हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय …
Read More »श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा
बेळगाव (प्रतिनिधी) : श्री सप्तकोटेश्वर देवस्थान समिती नार्वे डिचोली गोवा पुरातन खाते गोवा सरकार यांच्या वतीने गुरुवार दि. 9 फेब्रुवारी ते शनिवार दि. 11 फेब्रुवारी पर्यंत श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा या कालावधीत संपन्न होत आहे. गुरुवार दि. 9 फेब्रुवारी पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, देवतास्थापना, मुख्यदेवता, भवानी शंकर श्री …
Read More »येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवारी
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने रविवार (ता. 19) फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 18 व्या येळ्लूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम शनिवार (ता.11) रोजी सकाळी 8-30 वाजता परमेश्वर नगर येळ्ळूर येथील मराठी मुलांची शाळा येळ्ळूरवाडीच्या पटांगणात होणार आहे. 18 व्या येळ्लूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नारायण मयेकर होते. बैठकीला स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर, चीफ ऑफिसर आर. के. वटार होते. प्रास्ताविक प्रेमानंद नाईक यांनी केले. यावेळी बैठकीत खानापूरशहराच्या एस सी एस टी स्मशानभूमीत विद्युत खांबाची सोय करण्याबाबत चर्चा …
Read More »ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत राज्य सरकारनं पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे. ज्येष्ठ निरुपणकार …
Read More »आमदार हसन मुश्रीफांच्या तीन मुलांची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे. दाखल केलेल्या अर्जावर 16 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. राजकीय हेतूने अटक होण्याची शक्यता असल्याचा अटकपूर्व जामीन अर्जात उल्लेख करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने मुश्रीफांवर कथित …
Read More »चर्मकार समाज मोफत वधूवर सूचक मेळावा ५ मार्चला बेळगावात
बेळगाव : कर्नाटक राज्य हरळ्ळया (चर्मकार) समाजवतीने रविवार दिनांक 5 मार्च रोजी राज्य स्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात प्रोत्साह फाउंडेशनच्या पुढाकाराने चर्मकार समाज मोफत वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोत्साह फाउंडेशनच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत 5 मार्च रोजी येथील कुमार गंधर्व रंगमंदिरात मोफत वधू …
Read More »खासदार संजय राऊत यांना बेळगावात अटकपूर्व जामीन मंजूर
बेळगाव : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणूकीच्या काळात बेळगाव येथे येऊन वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात तारखांना हजर न राहिल्यामुळे त्यांच्यावर वॉरंट बजावण्यात आला होता. दरम्यान बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी खासदार संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला …
Read More »बेळगावात रंगणार पहिले बालनाट्य संमेलन!
बेळगाव : बेळगावमध्ये १८ व १९ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ आयोजित पहिले बालनाट्य संमेलन रंगणार आहे. ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ ने एक डौलदार पाऊल पुढे टाकत बेळगावमध्ये या साहित्य संमेलनाचे आयोजन केले असून सदर संमेलन बेळगाव येथील ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये आयोजिण्यात आले आहे. हे संमेलन सुमारे तीनशे मुलांसाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta