Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

बोरगाव येथील खत कारखान्यास आग लागून पाच कोटीचे नुकसान

  खतासह आयशर वाहन खाक : आग विझवण्यात अपयश निपाणी (वार्ता) : बोरगाव -इचलकरंजी रस्त्यावर असलेल्या खंडेलवाल बायो केमिकल खत कारखान्यास शनिवारी पहाटे आग लागून पाच कोटीचे नुकसान झाले आहे. विविध भागातून अग्निशामक दलाची वाहने येऊन सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. पहाटेच्या वेळी कारखान्यात कुणी नसल्याने सुदैवाने प्राणहानी झालेली नाही. …

Read More »

रायबाग तालुक्यातील निडगुंदीजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील निडगुंदीजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. दोन दुचाकींवरून निघालेल्या चार जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रायबाग पोलीस ठाण्यात घडली. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

Read More »

परिवारवादी काँग्रेस-जेडीएसला सोडा, भाजपला निवडून देण्याचा संकल्प करा, अमित शहा यांचे आवाहन

  बेळगाव : काँग्रेस आणि जेडीएस हे दोन्ही पक्ष परिवार वादावर आधारलेले आहेत. या उलट राष्ट्रभक्तीवर आधारित भारतीय जनता पक्ष केवळ जनतेच्या हितासाठी काम करत आहे. याचा गंभीरपणे विचार करून, जनतेने परिवारवादी पक्षांच्या मागे न लागता भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्याचा दृढ संकल्प व्यक्त करावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित …

Read More »

खानापूर समितीची विस्तृत कार्यकारिणी लवकरच!

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक 26 जानेवारी रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. व्यासपीठावर माजी आमदार दिगंबर पाटील, ज्येष्ठ सीमासत्याग्रही पुंडलीकमामा चव्हाण, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, सचिव सीताराम बेडरे, मारुती परमेकर, विलासराव बेळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका समितीची …

Read More »

बेळगावच्या पायलटला विमान अपघातात वीरमरण

  बेळगाव : भारतीय हवाई दलाची दोन लढाऊ विमाने आज शनिवारी सकाळी मध्यप्रदेशमध्ये दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. नेहमीच्या सरावासाठी अवकाशात भरारी घेऊन दुर्घटनाग्रस्त झालेल्या या विमानांमधील दोन वैमानिक गंभीर जखमी झाले असून बेळगावच्या एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. विमान दुर्घटनेत वीरमरण पत्करलेले वैमानिक विंग कमांडर हनुमंतराव रेवणसिद्द्प्पा सारथी हे गणेशपुर बेळगाव …

Read More »

मध्य प्रदेशात सुखोई-30 आणि मिराज-2000 कोसळले, एका पायलटचा करुण अंत

  भारतीय वायुसेनेची (IAF) दोन लढाऊ विमाने सुखोई-30 आणि मिराज-2000 मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात शनिवारी सकाळी नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळली. या भीषण अपघातात लढाऊ सुखोई विमानातील दोन पायलट सुदैवाने वाचले, पण मिराजमधील पायलटचा करुण अंत झाला. अपघात नेमका कसा घडला? सुखोई-30 आणि मिराज-2000 या दोन्ही अपघात झालेल्या विमानांनी आज सकाळी …

Read More »

इस्कॉनच्या 25व्या हरे कृष्ण रथयात्रेस उत्साहात प्रारंभ : आज, उद्या विविध कार्यक्रम

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या 25व्या श्री हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवास अभूतपूर्व जल्लोषात शनिवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. इस्कॉनचे ज्येष्ठ संन्याशी परमपूज्य राम गोविंद स्वामी महाराज, भक्ती रसामृत स्वामी महाराज, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, परमपूज्य चंद्रमौली महाराज आणि भक्तीचैतन्य …

Read More »

खानापूर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्याकडून आंदोलनाचा इशारा

  खानापूर : खानापूरमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची मागणी करण्यात आली आहे. एक कोटी खर्चून विद्यार्थी वसतिगृह बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण इमारत नादुरुस्त झाली आहे. इमारती बाजूने असलेली भिंत देखील कोसळलेली आहे. त्यामुळे वसतिगृह म्हणजे दारुड्यांचे ठिकाण झाले आहे. तरीही इमारत परत एकदा …

Read More »

बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये “फौंडर्स डे” निमित्त आंतरशालेय प्रतिभा संगम स्पर्धा यशस्वी

  बेळगाव : बी. ई. संस्थेच्या बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये “फौंडर्स डे” निमित्त प्रतिभा संगम या नावाने आंतरशालेय स्पर्धा दि. २७ जानेवारी २०२३ रोजी शाळेच्या शाळेच्या आवरणात आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये चित्रकला, हस्ताक्षर, योगासन, प्रश्नमंजुषा व जानपद नृत्य सामील होत्या. बेळगाव तालुका व शहरातील वेगवेगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने …

Read More »

तालुका म. ए. समितीतर्फे उद्या बेळगावात हळदी-कुंकू

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी (ता. २९) रोजी मराठा मंदिर येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महिलांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती करण्यासाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ऍड. श्रुती सडेकर व शीतल बडमंजी यावेळी …

Read More »