Thursday , December 18 2025
Breaking News

Belgaum Varta

येळ्ळूर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता अभियान

  बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त अवचारहट्टी रोड हरिमंदिर समोर बऱ्याच दिवसापासून कचऱ्याचा ढिगारा होता. याची दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी तातडीने त्याठिकाणी स्वच्छता अभियान केले व तो परिसर स्वच्छ करून दिला. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष …

Read More »

खेळाडूंचे कौतुक करणे हा प्रेरणादायी विचार आहे : माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळी

  बेळगाव : समाजात गुणवत्ता महत्त्वाची असते. खेळ हा जीवनात ऐक्य घडवितो. शिक्षणाने मनुष्याला लौकिकता मिळते. विद्यार्थी, शिक्षक व पत्रकार हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यासाठी सन्मान करणे, आदराची भावना ठेवणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे, असे मौल्यवान विचार माजी आम. परशुरामभाऊ नंदिहळी यांनी कावळेवाडीत वाचनालयाच्या सन्मान समारंभात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी विजयराव …

Read More »

बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गांधी जयंती साजरी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. पक्षाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल देसाई यांनी गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी शाम मंतेरो, दुर्गेश मेत्री, आप्पासाहेब पाटील, इस्माईल मुल्ला, रामकृष्ण सांबरेकर, सानंद पाटील, …

Read More »

चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचा सुवर्णमहोत्सव करण्याचा निर्णय

  माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत निर्णय बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ हि शिक्षण संस्था व संस्थेचे पहिले हायस्कूल श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळुर यांच्या स्थापनेला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संस्था व हायस्कूलचा संयुक्तपणे सुवर्णमहोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय आज संस्था, हायस्कूल व माजी विद्यार्थी यांच्या आज …

Read More »

कोवाडच्या वैभवात “सिलाई वर्ल्ड”मुळे भर : आमदार राजेश पाटील

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सध्याचे युग हे फॅशनचे युग आहे. फॅशनवरूनच व्यक्तिची ओळख होते. दयानंद सलाम या उद्योजकाने सुरू केलेल्या सिलाई वर्ल्डमुळे कोवाडच्या वैभवात भर पडली असल्याचे मनोगत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. कोवाड (ता. चंदगड) येथे दयानंद सलाम यांनी नामांकित कंपनिच्या तयार कपड्यांच्या ‘सिलाई वर्ल्ड’ शोरूमचा शुभारंभ …

Read More »

चित्रकला स्पर्धेत दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

  बेळगाव : आमदार अनिल बेनके यांच्यावतीने दसरा सणानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून आज शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नियोजित वेळेनुसार सरदार मैदानावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पावसामुळे महिला विद्यालय इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम शाळा, जीए महाविद्यालय आणि सरदार मैदानावरील सभागृहात …

Read More »

महात्मा गांधीजींच्या विचारांची देशाला गरज

युवा नेते उत्तम पाटील : बोरगावमध्ये गांधी जयंती निपाणी (वार्ता) : सत्य आणि अहिंसा मार्गावर निरंतरपणे लढा देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याशिवाय मिठाचा सत्याग्रह केला. त्यांच्या पदस्पर्षाने निपाणी तालुका पावन झाला आहे. अलीकडच्या काळात भ्रष्टाचार व इतर कारणामुळे महात्मा गांधींचे विचार बाजूला पडत आहेत. त्यामुळे …

Read More »

नगरपालिका पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

  गांधी जयंतीचे औचित्य : घंटागाडीला कचरा देण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : महात्मा गांधीजींनी ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले होते. त्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त येथील नगरपालिका पदाधिकाऱ्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी (ता.२) सकाळी महात्मा गांधी चौक परिसर, …

Read More »

स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजींसह क्रांतीकारकांनी मोठे योगदान

मंत्री शशिकला जोल्ले :निपाणीत गांधी पुतळ्याचे अनावरण निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजीसह क्रांतीकारकांनी मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी निपाणी येथे येऊन केलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्या जागेला गांधी चौक असे नाव दिले होते. त्यानंतर गांधी पुतळा करणे आवश्यक असताना केवळ चबुतराचा होता. नगरपालिका सभागृहासह नागरिकांच्या …

Read More »

महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपा

  खासदार अण्णासाहेब जोल्ले : नगरपालिकेत गांधी जयंती निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधी यांच्यासह क्रांतिकारकांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. बऱ्याच वर्षानंतर आता शहरात महात्मा गांधी पुतळ्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार शहरात पुतळा बसवला आहे. त्याची नगरपालिका कडून चांगली देखभाल होणार आहे. यापुढे काळातही तरुण आणि विद्यार्थ्यांनी …

Read More »