युवा नेते उत्तम पाटील यांचा नागरिक सत्कार निपाणी (वार्ता) : कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या कल्याणासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण ठरते. विकासाच्या वाटेत जाती, धर्म, प्रांत, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला असतात त्यामध्ये रोजगार हा महत्वाचा ठरतो. त्यामुळे हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळते. त्यामुळे तरूणांची मान …
Read More »मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडू
राजू पोवार :हालसिद्धनाथ साखर कारखान्याची वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : येथील श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्याची 34 वी वार्षिक सभा शनिवारी (ता.24) झाली. कारखान्याचे सभासद म्हणून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठेवाली यांनी अहवाल वाचन केले. त्यानंतर साखर कारखान्यानी …
Read More »सौंदत्तीजवळ भीषण अपघात; 4 जण ठार
बेळगाव : ट्रक, कार आणि दुचाकी यांची परस्परांमध्ये धडक होऊन झालेल्या तिहेरी अपघातात चौघे जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. सौंदत्ती तालुक्याच्या बुडीगोप्प क्रॉस नजीक ही घटना घडली. लोकापूरहून गोव्याकडे निघालेल्या सिमेंट लॉरीची बेळगावहून जाणाऱ्या कार आणि दुचाकीला धडक झाली. कार चालक निखिल कदम (वय 24, रा. बेळगाव), …
Read More »सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभाखेळीमेळीत पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन संजय शिंत्रे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे सचिव बाळासाहेब रणदिवे यांनी सर्वांचे स्वागत करून संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर संघाचे चेअरमन संजय शिंत्रे यांनी सांगितले की, संघाचे एकूण सभासद 1665 असून …
Read More »बेळगाव- पणजी राष्ट्रीय महामार्गात येणार्या लोंढा व्याप्तीतील शेतकर्यांची बैठक संपन्न
खानापूर (तानाजी गोरल) : बेळगाव- पणजी राष्ट्रीय महामार्गात खानापूर तालुक्यातील कित्येक गावांमधील शेतकर्यांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत. यापैकी लोंढा जिल्हा पंचायतीच्या व्याप्तीत येणार्या होनकल, शिंदोळी, नायकोल, सावरगाळी, माणिकवाडी, माडीगुंजी, लोंढा, अस्तोली, राजवळ या गावामधील शेतकर्यांना महामार्गांत गेलेल्या जमिनीचा सरकारकडून मिळणारा मोबदला अजून मिळाला नाही. ही बातमी समजताच खानापूर भारतीय …
Read More »माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा रुग्णालयात दाखल
बेंगळुरू: माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची प्रकृती खालावली असून त्यांना बेंगळुरू येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीव्र तापाने त्रस्त असलेल्या एस. एम. कृष्णा यांना रात्री उशिरा बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या एस. एम. कृष्णा यांची प्रकृती बरी झाल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. एस. …
Read More »‘चकदा एक्स्प्रेस’ला लॉर्ड्सवर विजयी निरोप, इंग्लंडवर 16 धावांनी दणदणीत विजय
लॉर्ड्सवर : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाने ती वनडे सामन्यांची ही मालिका 3-0 ने जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 168 धावा केल्या. भारताच्या 169 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ 43.4 षटकात अवघ्या 153 धावांवर गारद झाला. …
Read More »दसरा सणासाठी उत्सव स्पेशल रेल्वे
बेळगाव : दसरा सणासाठी नैऋत्य रेल्वेने उत्सव स्पेशल रेल्वे सुरू केली आहे. यशवंतपूर बेळगांव यशवंतपूर अशी ही उत्सव स्पेशल रेल्वे धावणार आहे. त्यामुळे दसरा कालावधीत रेल्वेला होणारी गर्दी टाळता येणार असून प्रवाश्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. नोकरीनिमित्त बेंगलोर येथे वास्तव्यास असणारे अनेक नागरिक गावी परतात. त्यामुळे रेल्वेला गर्दी …
Read More »सौंदत्ती यात्रेसाठी धावणार अतिरिक्त बस
बेळगाव : नवरात्रोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीखातर बेळगाव-सौंदत्ती मार्गावर तब्बल 7 अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. सोमवारपासून ही अतिरिक्त बससेवा सुरु केली जाणार आहे, अशी माहिती परिवहनचे विभागाचे नियंत्रण अधिकारी पी. वाय. नाईक यांनी दिली. नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांची संख्या अधिक असते. दरम्यान प्रवाशांची गैरसोय …
Read More »संकेश्वरात वीस रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर मुरगुडे मेमोरियल, एम.एम. जोशी नेत्रविज्ञान संस्थेच्या वतीने नुकतीच मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली. शिबिराचे आयोजन दिवंगत डॉ. श्वेता सचिन मुरगुडे वाढदिवस स्मरणार्थ श्रीमती शैलजा मुरगुडे यांनी केले होते. मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचा लाभ बहुसंख्य लोकांनी घेतला. शिबिरांतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास गरीब वीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta