खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी नवीन बोर्डिंग बांधण्यात आले असले तरी त्यामध्ये गेली दीड-दोन वर्ष विद्यार्थ्यांना त्या बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी अजूनही देण्यात आलेली नाही. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी संघटनेच्या वतीने गेल्या आठवड्यात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. परंतु अजूनही …
Read More »लम्पिसदृश्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी
भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांचे पशुकल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. कुलेर यांना निवेदन बेळगाव : शेतकरी व पशुपालकांसाठी त्रासदायक ठरलेल्या लम्पिसदृश्य जनावरांच्या कातडीवरील गाठीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, अशी विनंती करणारे निवेदन भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी पशुकल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. कुलेर यांना देण्यात आले …
Read More »प्रभावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदुषण प्रश्न कायमस्वरुपी सोडवा : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (जिमाका): प्रभावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी सोडवा, अशा सूचना देवून यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील …
Read More »सिद्राय होनगेकर नूतन एसडीएमसी अध्यक्ष
बेळगाव : मण्णूर (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळेच्या शाळा सुधारणा समितीच्या एसडीएमसी नूतन अध्यक्षपदी सिद्राय होनगेकर यांची निवड करण्यात आली आहे. मण्णूर येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये सीएसी कमिटीचे अध्यक्ष चेतन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एसडीएमसी समितीची पुनर्रचना बैठक आज बुधवारी सकाळी पार पडली. याप्रसंगी …
Read More »जिल्ह्यातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलिंग स्पर्धा : अनिल पोतदार
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पोतदार यांनी दिली बेळगाव येथे कार्यरत असलेल्या जिल्हा सायकलिंग असोसिएशनतर्फे महांतेश नगर येथील जिल्हा सहकारी दूध संघाच्या सभागृहात यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. अनिल पोतदार यांनी पत्रकार …
Read More »युवा नेते उत्तम पाटील युवा शक्तीचे रासाई शेंडूर येथे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर येथे उत्तम पाटील युवा शक्तीचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंतासह मान्यवरांचा सत्कार माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाला. गारगोटी येथे झालेल्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत शेंडूर येथील श्री जय भवानी मुलींच्या लेझीम पथकाने प्रथम …
Read More »डॉ. आंबेडकरांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा
निपाणी दलित संघटनांतर्फे निपाणीत मोर्चा : मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राची सोशल मीडियाच्या माध्यमातून विटंबना करण्यात आली आहे. आतापर्यंत समाजकंटकांनी अशा अनेक घटना घडविले आहेत. तरीही आंबेडकरांच्या अनुयायांनी संयमपणे आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करून दोषींवर तसेच …
Read More »ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन; मराठी साहित्य विश्वात शोककळा
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. कथा, कादंबरी आणि समीक्षा अशा विविध अंगांनी त्यांनी मराठीत लेखन केलं आहे. चिपळूण इथं भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षं …
Read More »बेळगावात महाराष्ट्राच्या मंत्र्यांना येऊ न देण्याची करवेची मागणी
बेळगाव : महाराष्ट्राचे मंत्री 3 डिसेंबरला बेळगावात आल्यास तदनंतर उद्भवणाऱ्या आपत्तीला राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी दिला आहे. या संदर्भात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या, नारायण गौडा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना …
Read More »सीमा समन्वयक मंत्र्यांचा बेळगाव दौरा
बेळगाव : सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई हे 3 डिसेंबरला बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. बेळगावमध्ये सीमावासीयांच्या भावना जाणून घेण्यासाठी येणाऱ्या उभय मंत्र्यांच्या बेळगावमधील दौऱ्याचा तपशील बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे. 3 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन पार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta