हिजाब वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात, विद्यार्थिनीनी दाखल केली याचिका बंगळूर : कर्नाटकातील हिजाब वाद आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये मुलींना हिजाब परिधान करून परीक्षेला बसण्याची परवानगी देण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने बुधवारी सुनावणी करण्याचे मान्य केले आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा …
Read More »महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आमदार जयंतराव पाटील रविवारी बेळगावात
सांगली : बेळगांव तालुका रुरल इंडस्ट्रीयल को- ऑप. क्रेडिट सोसायटीचा सुवर्ण महोत्सव रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या समारंभास आपण जरुर उपस्थित राहू, असे महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले. सोसायटीच्या संचालक मंडळाने नुकतीच पाटील यांची भेट घेऊन त्यांना समारंभाचे निमंत्रण देऊन उपस्थित राहण्याची विनंती …
Read More »कणकुंबी माऊली मंदिर आवारात स्वच्छता मोहीम
खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (ता. खानापूर) येथील जागृत देवस्थान माऊली देवीची यात्रा १२ वर्षानी गेल्या ८ ते १५ फेब्रुवारी पर्यंत मोठ्या उत्साहात पार पाडली. यात्रेला लाखोभाविकानी दर्शन घेतले. या काळात मंदिराच्या आवारात चारी बाजूंनी केरकचरा, प्लास्टिक बाॅटल, प्लास्टिक पिशव्या, इतर साहित्य जिकडे तिकडे विखुरलेले होते. या परिसरात पाळीव जनावरे …
Read More »खानापूर तालुका मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार
खानापूर : वेगवेगळ्या क्षेत्रात समाजासाठी योगदान देणाऱ्या साधकांचा सत्कार करणे हे विधायक कार्य आहे. असे सत्कार कर्तृत्ववान व्यक्तींना समाजासाठी आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे खानापूर तालुका मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने कुस्तीगीर संघटना आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येत असल्याचे चेअरमन आबासाहेब दळवी यांनी सांगितले. येथील खानापूर तालुका …
Read More »छत्रपती शिवरायांच्या जयघोषात “शिवसन्मान” पदयात्रेचा शुभारंभ
रमाकांत कोंडुसकर यांच्या उपक्रमाचे गावकऱ्यांनी केले कौतुक बेळगाव : बेळगाव सीमा भागातील मराठी भाषकांवर होणाऱ्या अत्याचाराला लगाम, बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवरायांची भव्य मूर्तीची स्थापना, अशा विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाला जाग आणण्यासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाद्वारे आजपासून येथील ऐतिहासिक राजहंसगडावरून शिवसन्मान पदयात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या …
Read More »अमेरिकेचे खासदार डॉ. श्री. ठाणेदार यांचे बेळगाव येथे 23 फेब्रुवारी रोजी होणार ‘बेळगावात नागरी सत्कार’
बेळगाव (रवींद्र पाटील) : मूळचे बेळगाव येथील श्री. ठाणेदार सध्या कायमस्वरूपी अमेरिका येथे वास्तव्याला असलेले अमेरिकन व्यापारी, लेखक व राजकारणी म्हणून अमेरिका सरकारचे खासदार हे भरतीय वंशाचे पहिले मराठी खासदार होण्याचा मान मिळवला. ते दि. 23 फेब्रुवारी बेळगाव रोजी नागरी सत्कार सोहळा मराठा मंदिर यांच्यावतीने मराठा मंदिर येथे सायंकाळी …
Read More »बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल सोसायटी एक विश्वासार्ह पतसंस्था
बेळगाव : बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने गेल्या आपल्या 50 वर्षाच्या यशस्वी वाटचालीद्वारे एक विश्वासार्ह पतसंस्था म्हणून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदा 53 व्या वर्षी या सोसायटीला 89 लाख 59 हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रातील विश्वासार्ह …
Read More »महादेवाच्या पालखीची मिरवणूकीने समाधी मठाला भेट महाप्रसादाचे वाटप
निपाणी (वार्ता) : महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचा रथोत्सव मंगळवारी (ता.२१) पार पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.२२) सकाळी येथील महादेव मंदिरापासून उत्सव मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर समाधी मठात उत्सव मूर्तीची पूजा करून महाप्रसादाचे वाटप झाले. प्रारंभी महादेव मंदिराजवळ महोत्सव कमिटीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते उत्सव मूर्तीस पुष्पहार …
Read More »पंतप्रधानांचा बेळगाव दौरा, दिलेली कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य सचिव वंदिता शर्मा यांची सूचना
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव आणि शिवमोगा जिल्ह्यातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत, या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी प्रत्येक कार्यक्रम नीटपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी, अशा सूचना दिल्या. आज बुधवारी वंदिता शर्मा यांनी, पंतप्रधानांच्या राज्यातील बेळगाव आणि शिवमोगा दौऱ्यातील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर …
Read More »‘हर, हर महादेवा’च्या गजरात निपाणीत रथोत्सव
हजारो भाविकांची उपस्थिती : रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता निपाणी (वार्ता) : करडी ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकांचा आकाशाला गवसणी घालणारा आवाज आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेला महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.२१) झाला. रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी रात्री उशिरापर्यंत रस्ते फुलले होते. दुपारी ३वाजता रथात बसण्यासाठी सवाल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta