Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

जळीत ऊसाला भरपाई न मिळाल्यास आंदोलन

राजू पोवार : मानकापूर जळीत ऊस क्षेत्राला भेट निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील मळी भागातील सुमारे २५ एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडली. आतापर्यंत निपाणी भागातील अनेक गावात शॉर्ट सर्किटने शेकडो एकरातील उसाचे नुकसान झाले आहे. पण आज पर्यंत हेस्कॉमतर्फे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. …

Read More »

हिंडलगा ग्राम पंचायतीकडून सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात

  बेळगाव : हिंडलगा पंचायतीने कचरा फेकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत नागरिक सर्वत्र कचरा टाकत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अभिनव उपाय योजिला आहे. मंगळवारी ग्रा.पं.चे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी सीसी कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात केली. तसेच ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांना …

Read More »

विद्यार्थ्याची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या

बैलहोंगल : समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बैलहोंगल शहरात घडली आहे. परशुराम कोनेरी (रा.कोडीवाड, ता. बैलहोंगल) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. इतर विद्यार्थी कॉलेजला निघून गेल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कॉलेजमधून परतल्यानंतर विद्यार्थ्याने दरवाजा अवघडल्याने इतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी …

Read More »

दोड्डहोसूर, निडगल, तोपिनकट्टीवासीय समितीच्या सदैव पाठीशी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अष्टप्रतिनिधी मंडळाचा दौरा दि. २१/११/२०२२ रोजी रात्री ७ वाजता दोड्डहोसूर येथे गावचे प्रतिष्ठीत नागरिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. नारायण महादेव पाटील गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मधू परशराम पाटील, रवळू पाटील, तुकाराम पाटील, देवाप्पा पाटील, संजय पाटील, कल्लाप्पा मादार, शंकर पाटील, ईराप्पा …

Read More »

रेल्वेच्या धडकेत दोन गायींचा मृत्यू

  बेळगाव : रेल्वेच्या धडकेत दोन गायींचा मृत्यू झाला. हा अपघात बेळगाव शहरातील तिसऱ्या व चौथ्या रेल्वे गेट दरम्यान सोमवारी रात्री घडला. रेल्वेने धडक दिल्याने गायींचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. माहिती मिळताच महामंडळाचे स्वच्छता निरीक्षक गणाचारी व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून गायींचे मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

Read More »

सौंदलगा येथे बाजारपेठेतील रस्त्याची चाळण; रस्त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

  सौंदलगा : सौंदलगा येथील बाजारपेठेतील रस्त्याची चाळण रस्त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, रस्त्यावरील खडे उखडून निघाल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवत असताना कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. सौंदलगा गाव हे पंचक्रोशीतील मध्यवर्ती ठिकाणी असून या गावातूनच आडी, बेनाडी, भिवशी, जत्राट, या गावातील नागरिकांना जावे लागते. त्याबरोबरच मंगळवारी येथे मोठ्या …

Read More »

हिंडलगा हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

  बेळगाव : हिंडलगा येथील हिंडलगा हायस्कूलच्या 1987-88 सालच्या बॅचमधील विद्यार्थी -विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन तब्बल 34 वर्षानंतर सोमनाथ लॉन, बॉक्साइट रोड हिंडलगा येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडले. हिंडलगा हायस्कूलच्या सदर बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी संघटितपणे स्वखर्चातून शाळेच्या नूतन इमारतीची रंगरंगोटी करण्याद्वारे शाळेबद्दलची आपली आत्मीयता प्रकट केली. या रंगरंगोटी केलेल्या शाळा …

Read More »

सीमाप्रश्नी पुन्हा तारीख पे तारीख

  बेळगाव : 23 नोव्हेंबर रोजी होणारी सीमाप्रश्नी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात सीमाप्रश्नी खटल्याचा समावेश होणार नाही. संपूर्ण सीमावासीयांचे लक्ष उद्या होणाऱ्या निकालाकडे होते. अनेक समितीप्रेमी हा निकाल “याची देही याची डोळा” पाहता, ऐकता यावा म्हणून दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र सुप्रीम कोर्टात या खटल्यावर …

Read More »

ट्रकच्या धडकेत पादचारी गंभीर

  बेळगाव : ट्रकची धडक बसून रस्त्यावरून जाणारा पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना छ. शिवाजी उद्यानासमोरील एसपीएम रोडवर सकाळी 7 च्या दरम्यान घडली. श्रीराम स्वामी (रा. शिवाजीनगर) असे जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. तसेच आपल्या …

Read More »

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याने सौहार्दता राखली पाहिजे : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

  बेंगळुर : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सौहार्दता कायम राखली गेली पाहिजे त्याचप्रमाणे सर्व भाषिकांना समान दृष्टीने पाहणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते नक्की पार पडेल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, जत तालुका हा तीव्र दुष्काळग्रस्त तालुका आहे. त्यांना मी सर्व …

Read More »