Tuesday , September 22 2026
Breaking News

Belgaum Varta

मणिपूर महिला अत्याचार व्हिडिओ प्रकरणातील आरोपीचे घर संतप्त महिलांनी जाळले

  इंफाळ : मणिपूर येथे मे महिन्यात दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल स्वत: सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट …

Read More »

भारतीय कृषक समाजातर्फे शेतकरी हुतात्मा दिन गांभीर्याने

  बेळगाव : भारतीय कृषक समाज, संयुक्त होराट कर्नाटक आणि यद्येळू कर्नाटका हागू प्रगतीपर संघटनेगळू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नरगुंद -नवलगुंद आंदोलनात बलिदान दिलेल्या शेतकऱ्यांचा 43 वा हुतात्मा दिन कार्यक्रम आज सकाळी गांभीर्याने पार पडला. शहरातील कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीकेएस तालुका अध्यक्ष संजीव डोंगरगाव हे होते. …

Read More »

‘मोदी चोर’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींच्या याचिकेवर ४ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

  नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२१ जुलै) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर नोटीस जारी करत याप्रकरणी ४ ऑगस्टला पुढील सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं. राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयाने ‘मोदी चोर’ या वक्तव्याप्रकरणी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. याच निकालानंतर …

Read More »

कोल्हापूरच्या दूधगंगा नदीच्या पाणीप्रश्नी गावकरी आक्रमक, काठावरील गावांचा कर्नाटकमध्ये सामील होण्याचा इशारा

  कोल्हापूर : कोल्हापूरच्या दूधगंगा नदी काठावरील गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा इशारा दिला आहे. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून सुळकूड पाणी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र पाणी द्यायला दूधगंगा नदीकाठाच्या गावांचा विरोध आहेत. इचलकरंजीसाठीच्या सुळकूड पाणी योजनेवरुन दूधगंगा बचाव कृती समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुळकूड, कसबा सांगाव, …

Read More »

पालकांची लूट करणाऱ्या शाळांवर कर्नाटक शासनाने उगारला कारवाईचा बडगा!

  निपाणी : निपाणीतील अनुदानीत व विनाअनुदानीत शाळेत विद्यार्थ्यांकडून कर्नाटक राज्य सरकारने ठरवून दिलेल्या फी पेक्षा प्रमाणाबाहेर फी ची आकारणी करून कमी रकमेची पावती दिली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर “4 जे आर ह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशन” या संघटनेच्यावतीने शिक्षणमंत्री कर्नाटक राज्य, शिक्षणाधिकारी बेंगलोर, शिक्षणाधिकारी बेळगाव व क्षेत्र शिक्षणाधिकारी, निपाणी गटशिक्षणाधिकारी …

Read More »

हलगा ग्रामपंचायत नुतन अध्यक्षपदी महाबळेश्वर पाटील (मेरडा), उपाध्यक्षपदी मंदा पठाण यांची बिनविरोध निवड

  खानापूर : हलगा (ता. खानापूर) ग्राम पंचायत पुढील ३० महिन्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड गुरूवारी दि. २० रोजी पार पडली. यावेळी अध्यक्ष पदासाठी महाबळेश्वर परशराम पाटील (मेरडा) यांची तर उपाध्यक्षपदी सौ. मंदा महादेव पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पाटील, रणजित पाटील, प्रविण गावडा, सुनिल …

Read More »

सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

  सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिकेत अमृत विभुते (वय 24 वर्षे रा. माडगुळे ता. आटपाडी) आणि विलास मारुती गूळदगड (वय 45 वर्षे रा.शेवते ता.पंढरपूर जि.सोलापूर) अशी मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. …

Read More »

जयस्वाल, रोहित, विराटची दमदार अर्धशतके, पहिल्या दिवसाअखेर भारत 4 बाद 288 धावा

  रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या दमदार सुरुवातीनंतर विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने चार विकेटच्या मोबदल्यात 288 धावा केल्या आहेत. विराट कोहली 87 आणि रविंद्र जाडेजा 36 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार अर्धशतके झळकावली. भारताचा मध्यक्रम झटपट कोसळळा. …

Read More »

खानापूर तालुक्यात संततधार सुरूच; 40 गावांना बेटाचे स्वरूप

  खानापूर : मागील दोन दिवसांपासून पश्चिम घाटात धुवाधार पाऊस सुरू झाल्यामुळे खानापूर तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक गावातील पूल व बंधारे पाण्याखाली आल्यामुळे खानापूर शहराशी कांही गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील जवळपास 40 गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. सतत पडत असणाऱ्या पावसाने हबनहट्टी येथील साधूचे …

Read More »

पहिल्याच पावसात स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार उघड!

  बेळगाव : मागील चार दिवसांपासून शहर परिसरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने मागील एक महिना ओढ देत आता दमदार पावसाला सुरवात झाली आहे. पुनर्वसूच्या तरण्या पावसाने शेतकऱ्यांना सावरले मात्र स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात अनेक ठिकाणी …

Read More »