बेळगाव : सामाजिक समतेचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री डी. देवराज अरसू यांची 107 वी जयंती बेळगावात आज उत्साहात साजरी करण्यात आली. बेळगाव शहरात आज, शनिवारी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, मागासवर्गीय कल्याण विभाग, महानगर पालिका आणि देवराज अरसू विकास महामंडळ यांच्या सहयोगाने सामाजिक समतेचे प्रणेते माजी मुख्यमंत्री देवराज अरसू यांच्या …
Read More »शल्यविशारद प्रसुती व स्त्री रोग तज्ञ उपाधीने डाॅ. ऋचा चिकोडे सन्मानित
निपाणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विश्वविद्यालय नाशिक यांच्या वतीने वैद्यकीय पदव्युत्तर स्तानकांच्या दीक्षांत प्रदान समारंभात डाॅ. ऋचा मधुसूदन चिकोडे हिचा शल्यविशारद प्रसुती व स्त्री रोग तज्ञ M.S.(Obst and Gynae) ही वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर सन्माननीय पदवी जेष्ठ नेत्र तज्ञ व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण विभाग माजी संचालक पद्मश्री डाॅ. …
Read More »जन्माष्टमी महोत्सवाची सांगता
बेळगाव : आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने गेल्या आठवडाभर चाललेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाची शनिवारी दुपारी सांगता झाली. काल मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव संपन्न झाल्यानंतर इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा अविर्भाव दिन आज शनिवारी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रभुपाद यांच्यासाठी आज श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात विशेष पूजेचे आयोजन …
Read More »शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे मराठा समाजाला किरण जाधव यांच्याकडून आवाहन
बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने शासनाच्या विविध समाजोपयोगी योजनांसंदर्भात जागृती करण्यासाठी मराठा समाजाचे नेते किरण जाधव, गुणवंत पाटील, सुनील जाधव, अक्षय साळवी, राजन जाधव यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे मराठा समाजाला आवाहन केले आहे. कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाचे अध्यक्ष मारुतीराव मुळे व मराठा समाजाचे …
Read More »माध्यान्ह आहाराचे नवे अधिकारी लक्ष्मण यकुंडी
खानापूर (विनायक कुंभार) : खानपूरचे यापूर्वीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांची मध्यान्ह आहार जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी 24 जून रोजी झालेल्या बदली प्रक्रियेत यकुंडी यांची मुनिराबाद जिल्हा कोपळ येथे डायटचे प्रमुख व्याख्याते म्हणून बादली झाली होती. या पदावर हजर न होता ते बेळगावात बदली करून घेण्याच्या प्रयत्नात होते. यानुसार …
Read More »युवक काँग्रेसकडून सिद्धरामय्यांवर अंडी फेकल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने
बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर मडिकेरी येथे अंडी फेकल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आज युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. मडिकेरी येथे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकणार्यांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आज बेळगावमध्ये युवक काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आले. शहरातील चन्नम्मा चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप …
Read More »सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील हॉटेलवर दहशतवादी हल्ला; 15 जणांचा मृत्यू
सोमालियात मुंबई झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मोगादिशूमधील आहे. जिथे बंदुकधारींनी हयात हॉटेलवर गोळीबार केला आणि दोन कारचा स्फोट …
Read More »सौंदलग्याची कन्या सौ. लता संकपाळ यांची कोगील खुर्द ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार
सौंदलगा : येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील यांनी सौंदलग्यातील रहिवासी संभाजी शिवाजी पाटील यांच्या कन्येच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी ग्रामपंचायत अध्यक्षा अर्चना कोगनोळे होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतचे माजी सचिव सुभाष कुंभार यांनी सर्वांचे स्वागत करून, सरपंच पदी निवड झालेल्या सौ. लता संकपाळ यांच्या कार्याचा …
Read More »माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुका भाजपकडून येडियुराप्पा यांचे अभिनंदन
खानापूर (विनायक कुंभार) : भाजप केंद्रीय संसदीय मंडळ व केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खानापूर तालुका भाजपकडून माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे अभिनंदन करण्यात आले. खानापूर तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी तालुका पंचायत सदस्य सुरेश देसाई आदींनी त्यांची बेंगलोर येथे भेट घेऊन शुभेच्छा …
Read More »टेंम्पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक; 2 ठार
बेळगाव : अथणीपासून मिरज रोडवर टेंम्पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले. तर सुमारे 20 विद्यार्थी जखमी झाले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून ते अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकत होते. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, अथणीपासून मिरज रोडवर 3 किलोमीटरवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta